शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

दक्षिण गोव्यात कमळ की हात?

By admin | Updated: May 16, 2014 01:06 IST

मडगाव : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला दक्षिण गोवा आपल्याकडेच राखून ठेवण्यात काँग्रेसला यश येते की, या मतदारसंघात भाजपा बाजू मारते, याचा फैसला शुक्रवारी होणार

 मडगाव : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला दक्षिण गोवा आपल्याकडेच राखून ठेवण्यात काँग्रेसला यश येते की, या मतदारसंघात भाजपा बाजू मारते, याचा फैसला शुक्रवारी होणार असून, दक्षिण गोव्यात ‘हात’ की ‘कमळ’ यावर दुपारी दोन वाजेपर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी सुरू होण्यास काही तास बाकी असताना काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपण किमान दहा हजार मतांच्या आघाडीने जिंकून येऊ, असा विश्वास व्यक्त केला. सासष्टीत मोठ्या प्रमाणात झालेले मतदान काँग्रेसच्याच पथ्यावर पडेल, असा दावा त्यांनी केला, तर भाजपाचे नरेंद्र सावईकर यांनी आपण सहज जिंकू, असा दावा केला. सासष्टीतही भाजपाला चांगल्या प्रकारे मते पडतील, असा दावा त्यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांनीही आपल्याला बर्‍यापैकी मते पडतील, असा दावा केला आहे. यंदाच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून तब्बल बारा उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात काँग्रेसचे रेजिनाल्ड लॉरेन्स, भाजपाचे नरेंद्र साईवकर, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राजू मंगेशकर, बहुजन मुक्ती पार्टीचे क्लिप्टन डिसोझा, तृणमूल काँग्रेसचे चर्चिल आलेमाव, ‘आप’च्या स्वाती केरकर, गोवा सुराज पार्टीचे सावियो रॉड्रिगीस, तर जवाहर डायस, गोविंद गावडे, बाळकृष्ण साळगावकर, व्हिनस हबीब व शालोम सार्दिन या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. रेजिनाल्ड यांनी आपण ‘सायलंट व्होटिंग’च्या आधारे जिंकून येऊ, असा दावा केला असला, तरी भाजपापासून कोणीही विजय हिरावून घेऊ शकणार नाही, असा दावा सावईकर यांनी केला. आतापर्यंत दक्षिण गोव्यातून केवळ एकदाच भाजपा विजयी झाला आहे. १९९९ साली भाजपाचे रमाकांत आंगले यांनी काँग्रेसचे जोकिम आलेमाव यांच्यावर १४,४१९ मतांच्या आघडीने विजय मिळविला होता. हा अपवाद वगळता आजपर्यंत परंपरेने दक्षिण गोवा काँगे्रसकडे राहिला आहे. २00९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नरेंद्र सावईकर यांनी काँग्रेसला चांगली टक्कर दिली होती. मात्र, त्यांना त्या वेळी १२,०१६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांना १,२७,४९४, तर सावईकर यांना १,१४,९७८ मते मिळाली होती. मडगावच्या दामोदर वाणिज्य महाविद्यालय संकुलात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. सुरुवातीला टपालाद्वारे आलेल्या मतांची मोजणी, नंतर मतयंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. एकूण दहा दालनांत ही मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक अधिकारी असलेले दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दामोदर महाविद्यालय व कारे महाविद्यालय अशा दोन ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. कारे महाविद्यालयात पहिल्या टप्प्यात सांगे, मुरगाव, वास्को, केपे, शिरोडा व काणकोण व दुसर्‍या टप्प्यात सावर्डे, कुठ्ठाळी, दाबोळी, कुडचडे, मडकई व फोंडा या मतदारसंघांतील मतांची मोजणी हाती घेणार आहेत, तर दामोदर महाविद्यालयात पहिल्या टप्यात नुवे, कुडतरी, फातोर्डा व बाणावली, तर दुसर्‍या टप्प्यात वेळ्ळी, कुंकळ्ळी, मडगाव व नावेली या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)