शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशात भरदिवसा बँक आॅफ इंडियात लूट

By admin | Updated: July 23, 2015 02:04 IST

बार्देस : सकाळी दहाची वेळ. बँक आॅफ इंडियाच्या म्हापसा शाखेतील महिला कॅशियरने १२.१0 लाख तिजोरीतून बॅगेत भरले. आपल्या केबिनमध्ये बॅग

बार्देस : सकाळी दहाची वेळ. बँक आॅफ इंडियाच्या म्हापसा शाखेतील महिला कॅशियरने १२.१0 लाख तिजोरीतून बॅगेत भरले. आपल्या केबिनमध्ये बॅग ठेवून तिने केबिनसमोर उभ्या असलेल्या ग्राहकाशी वार्तालाप सुरू केला. काही वेळानंतर आठ-दहा ग्राहक अचानक लगबगीने बँकेबाहेर पडले. त्या कॅशियरच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. संशयापोटी तिने आपल्या आसनामागील पैशाच्या बॅगेला हात घातला आणि तिच्या काळजात धस्स झाले! तब्बल १२.१0 लाखांची रोख रक्कम भरलेली ती बॅग गायब झाली होती... म्हापसा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुती मंदिराजवळील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत बुधवारी सकाळी ही चोरीची घटना घडली. हा परिसर गजबजलेला असल्याने चोरीची घटना कळताच शहरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच म्हापशाचे पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, इतर पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासकार्य हाती घेतले. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता बँकेचा दरवाजा उघडण्यापूर्वी १५ ते २० लोक बाहेर थांबले होते. दरवाजा उघडताच सर्वजण आत घुसले. बँकेचे कर्मचारी आपापल्या केबिनमध्ये तसेच कामाच्या ठिकाणी स्थानापन्न झाले. कॅशियर नीशा साळकर यांनी तिजोरीतील रोकड मोजून आपल्याकडील बॅगेत भरून त्या केबिनमध्ये आल्या. त्याचवेळी केबिनसमोर थांबलेल्या ग्राहकाने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यामुळे केबिनच्या दरवाजाला कडी घालायला त्या विसरल्या. बोलण्याच्या ओघात रोख रक्कम भरलेली बॅग त्यांनी आपल्या बैठकीच्या मागे ठेवली. बहुतेक ग्राहक बँकेतील खुर्च्यांवर बसून होते, तर काहीजण उभे राहून बोलत होते. या संधीचा फायदा घेत चोर प्रवेशबंदी असलेल्या जागेतून शेवटच्या केबिनकडे गेला. कॅशियर नीशा साळकर यांच्या केबिनचा दरवाजा उघडाच होता व त्या ग्राहकाशी बोलण्यात गुंतल्या होत्या. (पान २ वर)