शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

‘लोकमत’च्या नि:पक्ष पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 21:08 IST

आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संपादक राजू नायक यांचे अभिनंदन

पणजी : दै. ‘लोकमत’च्या नि:पक्ष व निर्भिड पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव करण्यात आला. गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विधानसभेत अभिनंदन करतानाच ‘लोकमत’ने चालविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल सदस्यांनी गौरवोद्गार काढले.कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सासवड-पुणे येथे अत्रे प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकताच हा पुरस्कार देण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.ठरावावर बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, ‘राजू नायक हे तत्त्वश: नेहमी माझ्या विरुद्ध भूमिका घेणारे; पण त्यांनी कधीच दोघांमध्ये शत्रुत्व येऊ दिले नाही. विरोधक असूनही एखाद्या माणसाबरोबर चांगले संबंध कसे ठेवावेत हे त्यांच्याकडून शिकावे. काही चुकीच्या गोष्टी छापून आल्या तर ज्या काही निवडक संपादकांना मी फोन करून सत्य सांगतो, त्यातील एक राजू नायक आहेत. ते ऐकूनही घेतात आणि नंतर वस्तुस्थितीही मांडतात.’विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, ‘राजू नायक यांची निर्भीड पत्रकारिता आदर्शवत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने या क्षेत्रात येऊ पाहणाºया नव्या पिढीचे मनोबल वाढेल.’आमदार दिगंबर कामत म्हणाले, ‘१९९४ साली मडगाव मतदारसंघात राजू माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले; पण आमची मैत्री कायम राहिली. ‘सुनापरान्त’चे संपादक असतानापासून आजतागायत ते लिखाणातून परखडपणे विचार मांडतात. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर अनेकदा प्रखरपणे टीका केली; परंतु संबंधांमध्ये कधीच कटुता येऊ दिली नाही.’कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘राजू नायक यांनी नेहमीच लोकांची बाजू लेखनातून लढविली. सामाजिक, राजकीय, पर्यावरण या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने युवा पत्रकारांचे मनोबल वाढणार आहे.’

‘लोकमत’शिवाय चैन पडत नाही : पर्यटनमंत्रीपर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, ‘राजू नायक संपादक असलेले ‘लोकमत’ वर्तमानपत्र सकाळी वाचल्याशिवाय चैन पडत नाही. खासकरून कुजबुज हा स्तंभ वाचनीय असतो. राजू व मी तळागाळातून वर आलो. दोघेही मित्र आहोत. त्यांनी प्रत्येक विषय कोणाचीही पर्वा न करता धाडसाने हाताळला. मडगावमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी मी लढा दिला, तेव्हा राजू नायक लेखणी तलवारीसारखे वापरत होते. त्यामुळे संपूर्ण शहर माझ्या विरोधात गेले. राजू नायक यांनी सातत्याने प्रखरपणे विरोधात लिहिले; परंतु आमच्या संबंधांमध्ये कधी कटुता येऊ दिली नाही. त्यांनी लेखणी नेहमी समाजाच्या भल्यासाठी वापरली.