शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

गोव्यातील कोट्यवधी रुपयांच्या किनारा सफाई घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांचा दणका

By admin | Updated: July 6, 2016 17:15 IST

गोव्यात किनाऱ्यांच्या सफाईचे काम करणाऱ्या दोन्ही कंत्राटदारांना यापुढे पैसे फेडू नयेत, असा आदेश लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिला आहे.

ऑनलाइ लोकमतपणजी, दि. ६ : गोव्यात किनाऱ्यांच्या सफाईचे काम करणाऱ्या दोन्ही कंत्राटदारांना यापुढे पैसे फेडू नयेत, असा आदेश लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिला आहे. कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे व सुरज बोरकर यांनी लोकायुक्तांकडे केली होती. १९ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. राम इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी व भूमिका क्लीन टेक प्रा. लि. कंपनी या दोन कंपन्यांकडे किनारा सफाईचे कंत्राट होते. यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पर्यटन खात्याच्या संचालकांनी त्यांचे म्हणणे मांडावे तसेच कंत्राटविषयक संबंधित फाइल सादर करावी, असे बजावले आहे. गेल्या वर्षी १८ मे रोजी आयरिश यांनी यासंबंधी दक्षता खात्याकडे केलेल्या तक्रारीस अनुसरुन कोणती चौकशी करण्यात आली यासंबंधीचा अहवाल सादर करण्यास दक्षता अधिकाऱ्यांना सांगितले आहे. किनारा सफाईच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना आयरिश यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, राम इंजिनीयरिंग आणि भूमिका क्लीन टेक या दोन्ही कंपन्यांचे मालक मनिष मोहता, पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे बंधू अवधूत यांच्याविरुध्द भादंसंच्या कलम ४२0, १२0 (ब), १९८८च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ८, ९, १३ (१) (ड) १३ (२) सह गुन्हे नोंदविण्याची मागणी केली होती. सप्टेंबर २0१४ साली हे कंत्राट देण्यात आले. उत्तर गोव्यातील किनाऱ्यांच्या साफसफाईचे वार्षिक ७ कोटी ५१ लाख ४0 हजार ९९९ रुपये कामाचे कंत्राट भूमिका क्लीन टेक कंपनीला तर दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांच्या साफसफाईचे काम राम इंजिनियरिंग या कंपनीला ७ कोटी ४ लाख ८७ हजार ९९९ रुपयांना दिले होते. दोन्ही कंपन्यांचे मालक मनिष मोहता हेच आहेत, असाही आयरिश यांचा दावा आहे.

एरव्ही २ कोटी रुपयांमध्ये होणाऱ्या कामासाठी १४ कोटी ५६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले. शास्रीय पध्दतीने किनाऱ्यांची सफाई केली जाईल, असे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात या दोन्ही कंपन्यांना त्याबाबत अनुभव नाही, असे आयरिश यांचे म्हणणे आहे. किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचून राहिले. कोणतीही साफसफाई झाली नाही. किनाऱ्यांवर कचरा जाळण्यात येऊ लागला तसेच काही ठिकाणी वाळूत तो पुरला जाऊ लागला. उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रकारही सर्रास घडू लागले. हे सिध्द करण्यासाठी आयरिश यांनी जवळपास १५0 फोटोही आयुक्तांना सादर केले होते.

वरील कंपन्यांना ही कंत्राटे मिळवून देण्यात पर्रीकर यांचे बंधू अवधूत यांची महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळे त्यांचीही चौकशी व्हायला हवी. या कोट्यवधी रुपये घोटाळा प्रकरणी कसून चौकशी करुन जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जावेत. कंपन्यांची कंत्राटे रद्द करुन सुरक्षा ठेव जप्त करावी, अशी आयरिश यांची मागणी आहे. ......आमदार रोहन खंवटेकृत समाधान आमदार रोहन खंवटे यांनी लोकायुक्तांच्या आदेशावर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठविला, तक्रारी केल्या तरी सरकार झोपले होते. लोकायुक्त आता काही ना काही भूमिका घेत असल्याने समाधानच आहे. १९ जुलैपर्यंत प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा करतो. या प्रकरणी आयोगाला काही दस्तऐवज हवे असतील ते सादर करण्याची माझी तयारी आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्याची तड लागली पाहिजे कारण हा जनतेचा पैसा आहे.