शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोपा विमानतळावर स्थानिकांना नोक-या मिळणारच : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:32 IST

२०२० सालापर्यंत सुमारे दोन हजार नोक-यांची निर्मिती

आॅनलाइन लोकमतपणजी, दि. १ : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम या वर्षअखेरीस सुरू होईल. २०२० सालापर्यंत सुमारे दोन हजार नोक-यांची निर्मिती होईल. विमानतळावर स्थानिकांना नोक-या मिळणारच, तशी तरतूद सरकारने समझोता कराराद्वारे केली आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.काँग्रेसच्या ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आदींनी या वेळी अनेक प्रश्न उपस्थित केले व स्थानिकांना नोक-या मिळायलाच हव्यात, असा आग्रह धरला. प्रश्नोत्तराच्या तासावेळी मोन्सेरात यांनी याबाबतचा मूळ प्रश्न मांडला होता. मोपा विमानतळावर स्थानिकांना नोक-या आरक्षित करणा-या कलमाचा समावेश समझोता करारामध्ये सरकारने केला आहे काय, अशी विचारणा मोन्सेरात यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. कलम पाचनुसार स्थानिकांना नोक-यांची तरतूद केली गेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.२०१७च्या अखेरीस मोपा विमानतळाचे काम सुरू होईल. त्यावेळी ५00 नोक-यांची निर्मिती होईल. २०१८ साली विमानतळामध्ये दीड हजार नोक-यांची निर्मिती होईल. २०१९ साली १७०० नोक-या निर्माण होतील. २०२० मध्ये १७५० नोक-यांची निर्मिती होईल, असे पर्रीकर यांनी नमूद केले.यापूर्वी कोकण रेल्वे गोव्यात आणतानाही कोकण रेल्वेमध्ये गोमंतकीयांना नोक-या मिळतील, असे सांगितले गेले होते. दाबोळी विमानतळ, गोव्यातील बँकांमध्येही नोक-या गोमंतकीयांना मिळतील, अशा घोषणा झाल्या होत्या; पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही, असे आमदार फालेरो म्हणाले. त्यावेळी समझोता करार करून स्थानिकांना नोक-या आरक्षित करायला हव्या होत्या. आम्ही लेखी शब्द घेतला आहे. त्यामुळे मोपा विमानतळामध्ये स्थानिकांना नोक-या मिळतील. ज्या सहा गावांमधील जागा विमानतळासाठी गेली आहे, त्यांना अगोदर नोकरीत प्राधान्य असेल. त्यानंतर पेडणे तालुक्यातील लोकांना व त्यानंतर पूर्ण गोमंतकीयांना प्राधान्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एनआयटीला देखील आम्ही जमीन देण्यापूर्वी स्थानिकांना नोक-या देण्याची लेखी हमी घेतली आहे. केवळ तोंडी हमी घेऊन चालत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

१४ घरे बांधून देणारपेडणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा दर्जा वाढवून तिथेच विमानतळासाठी लागणारे मनुष्यबळ प्रशिक्षित केले जाईल. विमानतळासाठी एकूण १५ घरे विस्थापित होत आहेत. त्यापैकी एकाचा विषय संपला, उर्वरित १४ घरांचे दुस-या जागी स्थलांतर केले जाईल. दुसरी जागाही सरकारने शोधली असून तिथे १४ घरे बांधून दिली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.