शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

नद्यांमधील गाळ उपसा

By admin | Updated: August 25, 2015 01:27 IST

पणजी : गोव्यातील जुवारी, मांडवी, शापोरा अशा सर्वच नद्यांमध्ये खूप गाळ साचलेला आहे. हा गाळ उपसला जावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

पणजी : गोव्यातील जुवारी, मांडवी, शापोरा अशा सर्वच नद्यांमध्ये खूप गाळ साचलेला आहे. हा गाळ उपसला जावा, अशी मागणी गोवा सरकारने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. सोमवारी मंत्री गडकरी हे गोवा भेटीवर होते. गोवा सरकारने त्यानिमित्ताने गडकरी यांच्यासमोर काही प्रस्ताव ठेवले. यात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे राज्यातील सर्व महत्त्वाच्या नद्या उपसण्याबाबतचा आहे, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले. जुवारी, मांडवी, शापोरा या नद्यांचे मुख अगोदर तातडीने उसपून द्या, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. राज्यात खनिज व्यवसाय सुरू होता, तेव्हा बार्जेस नद्यांमधून वाहतूक करत होत्या. बार्जमधील खनिज मातीही अनेक वर्षे या नद्यांमध्ये पडलेली आहे. त्यामुळे नद्यांची मुखे आणि पात्रेही बुजली आहेत, असा मुद्दा गडकरी यांच्यासमोर मांडण्यात आला. आता येत्या आॅक्टोबरमध्ये पुन्हा राज्यात नव्याने खनिज व्यवसाय सुरू होणार आहे. पुन्हा बार्जमधील माती नद्यांमध्ये सांडेल व पुन्हा नद्यांमधील गाळ वाढेल. हा गाळ काढण्यासाठी खर्च करण्याएवढा निधी राज्य सरकारकडे नाही व यंत्रसामग्रीही नाही याची कल्पना गडकरी यांना देण्यात आली. गडकरी यांनी केंद्र सरकार त्यासाठी मदत करील, असे राज्य सरकारला सांगितले. (खास प्रतिनिधी)