पणजी : जैका प्रकल्पात लाचखोरीचा आरोप असलेल्या लुईस बर्जर कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांना गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी अटक केली. लाच प्रकरणाची त्यांना पूर्ण कल्पना होती आणि कंत्राट मिळविण्यासाठी लाच देण्याचे कारस्थान तेथूनच शिजले होते, असे तपासातून उघड झाले आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) पुन्हा चौकशी करण्यात आली. मोहंती हे लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्षही होते. गोव्यातील मंत्र्यांना दिलेल्या कथित लाच प्रकरणाच्यावेळी कंपनीच्या पश्चिम भारतातील कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. जैका प्रकरणात कंत्राट मिळविण्यासाठी प्रसंगी लाच देण्याचा पर्याय वापरण्यासाठीही त्यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण मोकळीक दिली होती. हे सर्व प्रकरण त्यांच्या देखरेखीखाली घडले होते. त्यामुळे ते या लाचखोरीचे घटक बनतात, असा गुन्हा अन्वेषण विभागाचा दावा आहे. मोहंती हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले दुसरे संशयित आहेत. (पान २ वर)
लुईस बर्जरचा माजी उपाध्यक्ष अटकेत
By admin | Updated: August 4, 2015 02:32 IST