शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

किनारी भागातील गैरसोयी दूर करू

By admin | Updated: May 18, 2017 02:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपेडणे : पेडणे तालुक्यांतील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात कोणत्याही गैरसोयी दूर झाल्या नाहीत. स्वच्छतागृहांसह

लोकमत न्यूज नेटवर्कपेडणे : पेडणे तालुक्यांतील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात कोणत्याही गैरसोयी दूर झाल्या नाहीत. स्वच्छतागृहांसह सर्व सोयीसुविधा आगामी काळात पूर्ण केल्या जातील, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शहरातील पर्यटक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी नवीन पर्यटनस्थळे विकसित केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. किनारी भागात बेकायदा व्यवहारांना मुळीच थारा दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.सध्या पेडणे तालुक्यातील पर्यटन हंगाम संपुष्टात आला असून साहित्याचे पॅकिंग सुरू आहे. विदेशी पर्यटकांना आपल्या देशात परतीचे वेध लागले आहेत, त्यामुळे अनेक पर्यटन हंगामातील किनारी कुटिरे रेस्टॉरंट बंद केली आहेत. प्लास्टिक आच्छादने घालून आपला व्यवसाय बंद केला तो नवीन पर्यटन हंगाम येण्याची प्रतीक्षा करण्याच्या आशेने, तर काही जणांनी जागा आरक्षित करून आतापासूनच बांधकामे करून पुढच्या हंगामात व्यवसाय थाटण्याच्या दृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. किनारे सुने-सुनेविदेशी पर्यटक परतीकडे निघाल्याने किनाऱ्यांवर गर्दी कमी दिसते. किनारे सुने-सुने वाटतात. काही खासगी जागेतील रेस्टॉरंटमध्ये काही पर्यटकांची वर्दळ दिसते ती केवळ समुद्रस्नानासाठी. समुद्रस्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. आंघोळीसाठी दरवर्षी पिर्ण येथून येणाऱ्या ज्योती परब यांनी सांगितले की, आपण दरवर्षी मोरजी किनारी औषधी खाऱ्या पाण्याच्या आंघोळीसाठी येते. दरवर्षी किनाऱ्याचा चेहरा-मोहरा बदललेला असतो. मात्र, आजपर्यंत कोणतीच सोय नसल्याने आमचे हाल होतात. आमचे नातलग जवळच किनारी भागात असल्याने तेवढी अडचण येत नाही. मात्र, इतरांना विशेषत: जी अडचण येते, ती शब्दांत सांगता येत नाही. दरम्यान, किनारी भागात पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी ते संपेपर्यंत मोरजी, आश्वे-मांद्रे व हरमल या भागात राजरोसपणे बेकायदा संगीत रजनी आयोजित करून स्थानिकांना त्रास दिला जातो. अनेक लेखी तक्रारी करूनही आजपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही, त्यांच्या विरोधात तक्रारी करूनही गुन्हा नोंद केला नाही.