शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीसाठी निम्म्या डिलर्सनी घेतला आयडी

By admin | Updated: March 4, 2017 01:53 IST

पणजी : जीएसटीसाठी राज्यातील सुमारे १३ हजार डिलर्सनी हंगामी आयडी घेतला असून ५0 टक्के कव्हरेज झाले असल्याचा दावा

पणजी : जीएसटीसाठी राज्यातील सुमारे १३ हजार डिलर्सनी हंगामी आयडी घेतला असून ५0 टक्के कव्हरेज झाले असल्याचा दावा वाणिज्य कर खात्याने केला आहे. येत्या १५ पासून भारत सरकारचे याबाबतचे संकेतस्थळ बंद होणार आहे, त्याआधी उर्वरित डिलर्सनी आयडी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.खात्याचे आयुक्त दीपक बांदेकर म्हणाले की, राज्यात सुमारे २६ हजार डिलर्स आहेत. वार्षिक १0 लाखांपेक्षा अधिक उलाढाल असल्यास वाणिज्य कर खात्याकडे त्यांना नोंदणी करावी लागत होती. केंद्राच्या माल व सेवा कर (जीएसटी)च्या बाबतीत आता ही मर्यादा २0 लाखांपर्यंत नेण्यात आली आहे, त्यामुळे तीन ते चार हजार डिलर्स गळतील. ज्यांनी अजूनपर्यंत आयडी व पासवर्ड घेतलेला नाही त्यांनी तो घ्यावा याकरिता खात्याचे अधिकारी कार्यरत असून जाहिराती तसेच अन्य माध्यमातून व्यापक जागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. बांदेकर पुढे म्हणाले की, पूर्वी परराज्यातून माल आणल्यास तेथे भरलेल्या करावर वजावट मिळत नव्हती. एकापेक्षा अधिक कर भरावा लागत असे. आता जीएसटीमुळे एकच कर भरावा लागेल. दरम्यान, जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचेच वातावरण आहे. या करासाठी विवरणपत्र कसे भरावे तसेच अन्य बाबींबद्दलही अनभिज्ञता आहे. अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी या प्रश्नावर काही व्यापारी तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे सांगितले. आज शनिवारी परराज्यातून या विषयातील काही तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट येणार असून येथील व्यापाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील. जीएसटीमुळे करप्रणाली सुटसुटीत होणार असली तरी त्याचा व्यापारावर परिणाम होणार हे निश्चित, महागाईही वाढेल. या कराचे नेमके स्वरूप कसे असणार याबाबत जागृतीची गरज आहे. राज्यातील दुकानदार, माल विक्रेते, हॉटेलवाले, पेट्रोल पंपमालक इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींमध्ये जीएसटीबाबत नाराजी आहे. मद्य सोडून सर्व प्रकारचा माल, पेट्रोलजन्य पदार्थांवरही जीएसटी लागू होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वाणिज्य कर खात्याचा महसूल कमी झाल्यास केंद्राकडून आर्थिक भरपाई मिळायला हवी, अशा प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. व्हॅट व इतर कर काढून टाकल्यानंतर व केवळ जीएसटी लागू केल्यानंतर महसुलात तूट येऊ शकते. राज्य सरकारने किती तूट येते ते केंद्र सरकारला कळवावे लागेल. (प्रतिनिधी)