शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

नौदलासाठी गोव्यात प्राचीन तंत्राचा वापर करून बोट बांधकामाचा केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते शुभारंभ

By किशोर कुबल | Updated: September 12, 2023 14:27 IST

Goa: नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून  बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे. 

- किशोर कुबल दिवाडी - नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून  बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे.  केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आज या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

दिवाडी येथील होडी इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जहाज बांधणी कंपनी, भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि भारतीय नौदलाने या संबंधी अलीकडेच त्रिपक्षीय करार केला आहे. भारताचा प्राचीन सागरी वारसा पुनरुज्जीवित करणे हा या मागचा उद्देश आहे.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, भारताला खूप समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा आहे. जी आधुनिक भारतातली मोठ्या वर्गाला माहीत नाही. म्हणूनच  प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाईल'

नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले की,  'भारतीय नौदलाने नेहमीच देशाच्या  समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरेचे समर्थन केले आहे. भारत सरकारच्या या ऐतिहासिक प्रकल्पात सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे.'

प्रकल्पाविषयी तपशीलवार माहिती देताना, होडी इनोव्हेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रथमेश दांडेकर म्हणाले, की, ' लाकडावर पारंपरिक डिंक आणि तेल वापरुन प्राचीन तंत्रांचा वापर करून काळजीपूर्वक जहाज बांधून भारताच्या समृद्ध सागरी परंपरेला पुनरुज्जीवित करणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.बोट बांधून पूर्ण झाली की ऐतिहासिक व्यापारी मार्गांचा मागोवा घेत तीप्रवासाला निघणर आहे.' 

जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान तब्बल दोन हजार वर्षे जुने आहे. ही कला  पुनरुज्जीवित करणे हा हेतू आहे. पुरातन काळात महासागरात जाणाऱ्या जहाजांच्या बांधकामासाठी या तंत्रज्ञान वापर केला जात असे. २०२५ साली  भारतीय नौदल या बोटीवरुन  परिक्रमा करील,  अशी योजना आहे.  पंतप्रधान आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. ते म्हणाले की, भारताला मोठी सागरी परंपरा आहे. जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान युरोपियन जहाजे भारतात येईपर्यंत अस्तित्वात होते. नंतर ते लोप पावले. १८ महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. नंतर सहा महिने चाचणी घेतली जाईल व दोन वर्षात ही बोट प्रतिक्रियेसाठी सज्ज होईल. कार्यक्रमाला नौदल कर्मचारी आणि इतर  अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाindian navyभारतीय नौदल