शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडली लक्ष्मी’चे मायाजाल

By admin | Updated: July 30, 2014 07:26 IST

पणजी : ‘लाडली लक्ष्मी’ योजनेच्या लाभार्थींची संख्या आतापर्यंत एकूण १५ हजार ५७७ झाली असून सरकारने १५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या योजनेवर खर्च केला आहे.

पणजी : ‘लाडली लक्ष्मी’ योजनेच्या लाभार्थींची संख्या आतापर्यंत एकूण १५ हजार ५७७ झाली असून सरकारने १५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या योजनेवर खर्च केला आहे. भाजप आमदारांच्या मतदारसंघात सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे, तर दोन अपक्ष आमदार आणि नऊ काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात योजनेवर सुमारे ३६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा ३६ कोटींचा खर्च म्हणजे ‘राजकीय गुंतवणूक’ असल्याचे काही विरोधी आमदारांचे मत आहे. काँग्रेस व काही अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात सत्ताधारी भाजप कार्यकर्ते लाडली लक्ष्मी योजनेची मंजुरी पत्रे वाटतात. योजना मंजूर झाल्यानंतर भाजपच्या काही मंडळांना त्याबाबतची माहिती अगोदर मिळते. काँग्रेसच्या ताब्यातील काही मतदारसंघात तर लाडली लक्ष्मीचे शेकडो अर्ज हे भाजपच्याच मंडळ समित्यांनी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांकडून भरून घेतले. आपल्या मतदारसंघात आपल्याऐवजी भाजप कार्यकर्त्यांनीच सादर केलेले जास्त अर्ज मंजूर झाले, असे एका काँग्रेस आमदाराने सांगितले. लाडली लक्ष्मी, गृह आधार अशा अनेक योजनांचे राजकीयीकरण झालेले आहे. आमदारांची सही अर्जावर आणण्याची सक्ती त्याच हेतूने केली जात आहे. लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत मुलींना लग्नासाठी प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातात. स्वयंरोजगारासाठीही या योजनेंतर्गत सरकार अर्थसाहाय्य देत आहे. पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून त्या तालुक्यात लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभार्थींची संख्या ११६२ झाली आहे. बाबू कवळेकर यांच्या केपे मतदारसंघात लाडली लक्ष्मीच्या लाभार्थींची संख्या गोव्यात सर्वांत जास्त म्हणजे ६७९ आहे. याचा अर्थ कवळेकर यांनीच सगळे अर्ज भरून घेतले असा होत नाही, असे सूत्रांनी सांगितले. या पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय गुंतवणूक म्हणून विविध शासकीय योजनांकडे सत्ताधारी पक्ष पाहत असून त्या दृष्टीनेच भाजप कार्यकर्ते सक्रिय आहेत. (खास प्रतिनिधी)