पणजी : दिल्लीतील निकालांचा पणजी पोटनिवडणुकीत भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पर्रीकर यांनी २0१२च्या निवडणुकीत मिळविलेल्या मतांपेक्षा किमान एक हजार अधिक मते मिळवून विजयी होतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला. पर्रीकरांच्या कारकिर्दीतच पणजीचा विकास झालेला आहे, असा दावा करून तेंडुलकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना तेंडुलकर म्हणाले की, लुईझिन सात-आठ वर्षे गोव्यात नव्हते. त्यामुळे येथे काय झाले आणि नाही याबद्दल त्यांनी बोलू नये. पणजीतील मतदार सुशिक्षित आहेत, म्हणूनच त्यांनी भाजपला सलग पाचवेळा ही जागा दिली. (प्रतिनिधी)
पर्रीकरांपेक्षा मिळणार कुंकळ्येकरांना मताधिक्य!
By admin | Updated: February 13, 2015 01:14 IST