शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशातील विविध न्यायालयांमध्ये तब्बल ५ कोटी खटले प्रलंबित - किरेन रिजिजू 

By किशोर कुबल | Updated: March 6, 2023 19:13 IST

देशातील विविध न्यायालयांमध्ये तब्बल ५ कोटी खटले प्रलंबित आहेत असे किरेन रिजिजू यांनी म्हटले. 

पणजी : देशभरातील विविध न्यायालयांमध्ये ४.९८ कोटी खटले प्रलंबित असून ते हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. गोव्यात २३ व्या राष्ट्रकुल कायदा परिषदेत ते बोलत होते. राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. ९ मार्चपर्यंत ही आंतरराष्ट्रीय परिषद चालणार असून ५२ देशांचे ५०० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत.

रिजिजू म्हणाले की, ''आम्ही ई-कोर्ट आणि विशेष प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे. आमचे अंतिम लक्ष्य भारतीय न्यायव्यवस्था पेपरलेस करणे आहे. आगामी संसदीय अधिवेशनात ६५ अप्रचलित आणि अनावश्यक कायदे काढून टाकण्यासाठी विधेयके आणली जातील. गेल्या साडे आठ वर्षांच्या काळात १,४८६ अप्रचलित आणि अनावश्यक कायदे काढून टाकण्यात आले आहेत.'' 

किरेन रिजिजू म्हणाले की,‘ एक न्यायाधीश रोज सरासरी ५० ते ६० खटले हाताळू शकतो. प्रलंबित खटल्यांचे आव्हान पेलण्याशिवाय पर्याय नाही. सुशासन संकल्पनेचे अनेक पैलू आणि वैशिष्ट्ये आहेत. भ्रष्टाचार कमी करणे आणि दूर करणे आणि निर्णय घेताना समाजातील सर्वात असुरक्षित घटकांचा आवाज ऐकला जाणे हे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केवळ व्यवसायसुलभता नाही तर राहणीमान सुलभतेवर भर देऊन सुशासनाला चालना देण्याप्रती कटीबद्ध आहे. यामध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेचा मोठा वाटा आहे, असेही ते म्हणाले.

व्यवसायसुलभता आणि जीवन सुलभतेला चालना देत सरकारने १३ हजार क्लिष्ट नियम सुलभ केले आहेत आणि तर १२०० पेक्षा अधिक दस्तावेजांचे डिजीटल स्वरुपात जतन केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तंत्रज्ञानावर आधारीत (व्हर्च्युअल) न्यायालये, ई-सेवा केंद्र आणि उच्च न्यायालयांमधील माहितीडेस्क यासारख्या न्याय वितरणातील सामान्य लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी उचललेल्या विविध उपयांची कायदेमंत्र्यांनी माहिती दिली. 

 

टॅग्स :goaगोवा