शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विधानसभेत कर्माचा वाद

By वासुदेव.पागी | Updated: August 8, 2023 12:52 IST

"आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मांवर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांनी  निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत असे सांगितले."

पणजी : ताम्नार वीज वाहिन्या प्रकल्पासाठी कर्नाटकातच अलाईन्मेंट निच्छित झालेली नसताना गोवा सरकर गोव्यात हा प्रकल्प निश्चित कसा काय करू शकते, असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. त्यावर थेट उत्तर न देता वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी माणसाने आपली कर्मे चांगली केली पाहिजेत, असे म्हणत मुद्द्यावर कर्मवादावर चर्चा सुरू झाली.

आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मांवर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांनी  निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत असे सांगितले. निवडणुकीपूर्वी ममता बेनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस बरोबर युती केलेले ढवळीकर यांनी ताम्नार प्रकल्पाला विरोध केला होता याची आठवण करून दिली. आता सरकारात सामील होऊन मंत्री भलतीच कर्मे करीत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारच्या अशा कर्मांमुळे गोव्याची वाट लागत असल्याचे सांगितले.मंत्र्यांनी ताम्नार प्रकल्प हा गोव्याच्या भल्यासाठीच असल्याचे सांगितले. कर्र्नाटकातून वीज आणण्यासाठीचा हा विद्यमान प्रकल्प आंबेवाडी येथून सुरू होतो. तेथून सांगोडा व नंतर धारबांदोडा आणि तेथून कुंकळ्ळी आणि नंतर  तेथून शेल्डे येथे या वीज वाहिन्या ओढल्ल्या जाणार आहेत.  या प्रकल्पासाठी १०३ टॉवर पूर्ण झाले आहेत असे त्यांनी सांगितले.या प्रकल्पात १४ हजार झाडे कापली जाणार असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला, परंतु झाडे अधिक कापावी लागणार नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. परंतु नेमकी किती झाडे कापावी लागणार असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला असता यावर उत्तर देण्यासाठी मंत्र्यांनी वेळ मागितला 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा