शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कार्ल वाझ यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

By admin | Updated: August 19, 2016 02:10 IST

मडगाव : मुरगावचे माजी आमदार कार्ल वाझ यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. गुरुवारी मडगावात एका पत्रकार परिषदेत वाझ यांनी

मडगाव : मुरगावचे माजी आमदार कार्ल वाझ यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. गुरुवारी मडगावात एका पत्रकार परिषदेत वाझ यांनी या पक्षात प्रवेश करताना आपण सैनिक म्हणून या पक्षात आलो आहोत. मात्र, पक्षाने जबाबदारी सोपविल्यास कमांडरही बनू असे सांगत आगामी निवडणुकीत आपतर्फे निवडणूक लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले. आपचे गोवा प्रभारी पंकज गुप्ता, गोवा राज्य निमंत्रक राजश्री नगर्सेकर, रूपेश शिंक्रे, लिबी मेन्डोस्का आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज राजकारणी अमाप पैसा खर्च करत आहेत. हा पैसा करदात्यांचा आहे. आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ पाहात आहे. त्यामुळे प्रभावित होऊन आपण या पक्षात प्रवेश केल्याचे वाझ यांनी सांगितले. राजकारणात राहून भ्रष्टाचारापासून दूर राहणे कठीण आहे. मात्र, आपचा नारा भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असा आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून या पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आपचा नारा हा राष्ट्रीय संपत्ती वाचवा असा आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी सांगितले. आप पक्ष खासकरून अल्पसंख्याकांची मतविभागणी करण्यासाठी गोव्यात आला आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता गुप्ता यांनी या आरोपाचे खंडन केले. उत्तर गोव्यात आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्ही मतविभागणीसाठी नाही आलो. सर्व जातीजमातीच्या मर्यादा पार करून लोकांकडून आम्हाला प्रतिसाद लाभत आहे. कॉँग्रेसचे नेते आम्ही मतविभागणी करत असल्याचे सांगतात. ते एकाच घटकाच्या मतांवर विसंबून आहेत. तर मुख्यमंत्री आम्ही कॉँग्रेसची मते विभागणार असे सांगतात. आम आदमी पक्ष सर्व लोकांना सामावून घेऊन भारत एक नंबरचा देश बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)