शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माडासंबंधी दुरुस्त्यांना न्यायालयात आव्हान!

By admin | Updated: May 3, 2016 01:59 IST

पणजी : माडाला ‘गवत’ बनविण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान देण्यात आले असून

पणजी : माडाला ‘गवत’ बनविण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान देण्यात आले असून सरकारला या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. प्रजल साखरदांडे यांनी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत सरकारने २००८च्या कायद्यात केलेली दुरुस्ती ही अवैध असल्याचे म्हटले आहे. २००८च्या वन कायद्याने केलेल्या दुरुस्तीत माड हे झाडांच्या यादीत टाकण्यात आले होते. माडांचे संवर्धन करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु भाजप सरकारने २०१६मध्ये नव्याने या कायद्यात दुरुस्ती करताना माडाला गवताच्या यादीत टाकले आहे. नवीन दुरुस्तीमुळे माडांची सरसकट कत्तल होईल, अशी भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. ही दुरुस्ती मागे घेण्याचा आदेश सरकारला देण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकादाराने केवळ माडाचा गवताच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीला आक्षेप घेतला असे नव्हे, तर नवीन व्याख्येनुसार करण्यात आलेल्या झाडाच्या व्याख्येलाही आक्षेप घेतला आहे. झाड असे संबोधण्यासाठी झाडाच्या घेऱ्याची रुंदी जी वाढविण्यात आली आहे, ती कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याचिकादारातर्फे मुंबईचे वकील शिरवई यांनी जोरदार युक्तिवाद केले. २००८च्या कायद्यात करण्यात आलेली दुरुस्ती ही कायदा व घटनेला धरूनच आहे. त्यामुळे ही याचिका दाखल करून घेण्याची काही आवश्यकता नाही, असा दावा सरकारतर्फे युक्तिवाद करताना अतिरिक्त सरकारी वकील प्रवीण देसाई यांनी केला. याचिका दाखल करून घेताना न्यायमूर्ती एफ. एम. रेईश व नूतन साखरदांडे यांच्या खंडपीठाने सरकारला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला. यानंतरची सुनावणी आता उन्हाळी सुट्टीनंतर म्हणजे १३ जून रोजी होणार आहे. माडाला गवत ठरविणारी वादग्रस्त कायदा दुरुस्ती केल्यानंतर संपूर्ण राज्यात या मुद्द्यावरून संतप्त पडसाद उमटले होते. अनेक आंदोलनेही झाली होती. आमदाराचा संबंध असलेल्या सांगे येथील एका प्रकल्पासाठी माड कापावे लागत असल्यामुळे त्यांची व्यवस्था करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आल्याचा लोकांचा आरोप होता. तसेच गोवा विधानसभेतही याचे जोरदार पडसाद उमटले होते. विरोधी सदस्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता; परंतु सर्व विरोधाला न जुमानता ही दुरुस्ती करण्यात आली होती. (प्रतिनिधी)