पणजी : जॉन फर्नांडिस यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केली असली, तरी त्यांनी शिफारस केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या टीमबरोबरच नवीन अध्यक्ष लुईझिन फालेरो यांना काम करावे लागणार आहे. फर्नांडिस यांनी शिफारस केलेल्या उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या अध्यक्षपदांसाठी तसेच सर्व ४० गट अध्यक्षांसाठीच्या नावांवर प्रभारी दिग्विजय सिंग यांनी शिक्कामोर्तब केले आहे. फालेरो यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविली असली तरी त्यांना फालेरो यांचीच माणसे घेऊन काम करावे लागणार आहे, असे सध्या तरी चित्र आहे. फर्नांडिस यांनी पक्षाच्या गट आणि जिल्हा समित्या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. फर्नांडिस यांना पदावरून काढून टाकण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्णही केली होती. जिल्हा समित्यांवर उत्तर गोव्यासाठी अध्यक्ष म्हणून विजय भिके आणि दक्षिण गोव्यासाठी जॉन डिकॉस्ता यांची निवड केली होती. त्यांच्या नावाची फर्नांडिस यांनी हायकमांडकडे शिफारस केली होती. गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी मंजुरी दिली होती. शिक्कामोर्तबासाठी ही यादी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविली होती, अशी माहिती कॉँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
फालेरोंच्या नेतृत्वाखाली जॉन यांची टीम
By admin | Updated: October 13, 2014 02:17 IST