शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरने आणली इफ्फीत जान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 20:09 IST

निरस, रटाळपणे सुरु झालेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज युवा रसिकांची धडकन जान्हवी कपूरने जान आणली.

- संदीप आडनाईकपणजी : निरस, रटाळपणे सुरु झालेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज युवा रसिकांची धडकन जान्हवी कपूरने जान आणली. गेल्या दोन दिवसापासून इफ्फीत युवा सिनेरसिकांना कोणते कलाकार येणार याची उत्सुकता लागून राहिली होती, ती जान्हवी कपूरने भरुन काढली. कर्न्व्हसेशन वुईथ कपूर्स हा कला अकादमीत झालेल्या मास्टर क्लासमध्ये बापबेटींची मुलाखत घेतली. यासाठी बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर उपस्थित राहणार होते. मात्र नव्या चित्रपटातील व्यक्तिरेखा जाहीर होउ नये यामुळे अर्जुन कपूर उपस्थित राहिले नाहीत. त्याबद्दल बोनी कपूर यांनी दिलगिरी व्यक्त केली.इफ्फी स्थळावर जान्हवी कपूर येताच प्रतिनिधींनी विशेषत: युवा प्रतिनिधींनी जल्लोष करुन तिचे स्वागत केले. कला अकादमीच्या रेड कार्पेटवर बोनी कपूरसोबत आलेल्या जान्हवीने धडक चित्रपटातील गाण्याच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांच्या गर्दीत कार्यक्रम स्थळी प्रवेश केला. जान्हवीने साऱ्याच युवा प्रतिनिधींंची मने जिंकली. तिच्यासोबत सेल्फी, फोटो काढण्यासाठी सर्वांनीच गर्दी केली होती.प्रश्नोत्तराच्या वेळीही जान्हवीने नव्या जुन्या पिढीतील कलाकारांचा आदर करत संयमित उत्तरे दिली.*बच्ची थी,फिर एक दिन अचानक ममा को खो दियामां की आवाज में बात करती हूंइसी जरीए मै उनको अपनी पास रखती हूं*आई श्रीदेवीच्या आठवणीने काहीशी गहिवरलेल्या जान्हवीने तिच्यावरील कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. आवडत्या नायिकेमध्ये मीनाकुमारी, वहिदा रेहमान, रेखा, नूतन, मधुबाला यासारख्या कलावंतांची नावे घेतली तर नायकांमध्ये दिलिपकुमार, गुरुदत्त यांचे नाव घेतले. अलिकडच्या चित्रपटांसोबत सुजाता, बंदिनी, सीता और गीता, मदर इंडिया या चित्रपटांचा उल्लेख केला. दिग्दर्शक निर्माता राहुल रवैल यांनीही तिचे याबद्दल कौतुक केले.केवळ एकच चित्रपट नावावर असलेल्या जान्हवीने आईप्रमाणेच मल्याळम, कन्नड आदि भाषांमध्येही काम करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून कामाप्रती निष्ठा असल्याचे दाखवून दिले. नव्या पिढीने जुन्याकडून काय घेतले, अशा प्रश्नावर तिने संयमितपणे जुन्या काळातील कलाकारांचा अभिनय, कामाप्रती निष्ठा, पूर्वीच्या चित्रपटातील कथानक यांचा आवर्जुन उल्लेख केला. मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस ५५ या गुरुदत्त यांच्या चित्रपटाचा दाखला देउन हा चित्रपट कथेच्या दृष्टीने आणि अभिनयाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट असल्याचे तिने सांगितले.