शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

तुरुंग अधीक्षकानेच मारायला सांगितले!

By admin | Updated: October 15, 2015 02:13 IST

पणजी : कोलवाळ येथील तुरुंगातील कैद्यांना मारहाण करण्यास तुरुंग रक्षकांना तेथील अधीक्षक मेल्वीन वाझ यानेच सांगितले होते, असा प्राथमिक निष्कर्ष सरकारने काढला आहे.

पणजी : कोलवाळ येथील तुरुंगातील कैद्यांना मारहाण करण्यास तुरुंग रक्षकांना तेथील अधीक्षक मेल्वीन वाझ यानेच सांगितले होते, असा प्राथमिक निष्कर्ष सरकारने काढला आहे. त्या दृष्टिकोनातून चौकशी करण्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी सचिन शिंदे (आयएएस) यांना सांगितले आहे. कोलवाळमधील अनेक कैद्यांना सोमवारी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकाराची दखल घेऊन तुरुंग महानिरीक्षक एल्वीस गोम्स यांनी जरी पाच तुरुंग रक्षकांना सेवेतून निलंबित केले, तरी अधीक्षक मेल्वीन वाझ यांना मात्र गोम्स यांनी थेट दोष दिला नव्हता. मंगळवारी रात्रीच गोम्स यांनी कोलवाळ घटनेची चौकशी करून आपला प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांना सादर केला. मारहाणीवेळी वाझ यांची भूमिका काय होती, याची चौकशी व्हायला हवी, असे गोम्स यांनी सरकारला सुचविले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी कोलवाळ तुरुंगातील एकूण प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली व मुख्य सचिवांशी रात्रीच चर्चा केली. वाझ यांनीच कैद्यांना मारहाण करा, असे तुरुंग रक्षकांना सांगितले होते, अशी प्राथमिक माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली व त्यामुळे वाझ यांना त्वरित सेवेतून निलंबित करा, असा आदेश पार्सेकर यांनी मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांना दिला. वाझ यांची मंगळवारी सायंकाळी सरकारने कोलवाळहून मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली व नियुक्ती केली होती. तथापि, पार्सेकर यांनी बदली रद्द करा व वाझ यांना निलंबित करा, अशी सूचना मुख्य सचिवांना केली. वाझ यांच्या निलंबनाचा रितसर लेखी आदेश बुधवारी जारी झाला. ‘लोकमत’ने सर्वप्रथम बुधवारच्या अंकात वाझ यांच्या निलंबनाचे वृत्त दिले. वाझ या अधिकाऱ्याची कारकिर्द कायम वादाची राहिलेली आहे. वाझ यांनी खरोखरच मारहाणीचा आदेश दिला होता काय, हे सचिन शिंदे यांच्या चौकशीतून निष्पन्न होईल. चौकशी अधिकाऱ्यावर दबाव येऊ नये या हेतूनेच मुख्यमंत्र्यांनी शिंदे या आयएएस अधिकाऱ्याकडे चौकशीचे काम सोपविले. (खास प्रतिनिधी)