शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानांचा मुद्दा पेटणार

By admin | Updated: February 12, 2017 01:26 IST

पणजी : महामार्गांच्या बाजूची पाचशे मीटरमधील बार व दारूची दुकाने हटविण्याच्या आदेशावरून राज्यातील दारू व्यावसायिक आक्रमक

पणजी : महामार्गांच्या बाजूची पाचशे मीटरमधील बार व दारूची दुकाने हटविण्याच्या आदेशावरून राज्यातील दारू व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. सरकारने याप्रश्नी तोडगा काढला नाही, तर आम्ही प्रसंगी महामार्गांवर उतरून वाहतूकही रोखू, असा इशारा गोवा मद्य व्यापारी संघटनेतर्फे शनिवारी दिला. बार बंद केले तर, सुमारे चार लाख गोमंतकीयांच्या उपजीविकेवर गदा येईल आणि ७० टक्के व्यवसाय नष्ट होण्याचा धोका संभवतो, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यास अनुसरून येत्या १ एप्रिलपासून महामार्गांच्या बाजूचे बार व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करायचे नाही, असे अबकारी खात्याने ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथे शनिवारी गोवा मद्य व्यापारी संघटनेची व्यापक बैठक झाली. सुमारे ५०३ सदस्य या बैठकीस उपस्थित राहिले. नाईक यांच्यासह संघटनेचे कायदा सल्लागार अ‍ॅड. पालेकर, पदाधिकारी प्रवीण केरकर, विवेक केरकर, सॅड्रीक वाझ, मारियो सिक्वेरा, दिनेश केनावडेकर, इनासिवो डिसोझा, मंगलदास नाईक आदी या वेळी व्यासपीठावर होते. संघटनेने एकूण बारा सदस्यीय समिती शनिवारी स्थापन केली व महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरमध्ये किती दारू दुकाने आहेत ते निश्चितपणे आठवडाभरात शोधून काढण्यास या समितीला सांगितले आहे. बारा तालुक्यांतील प्रत्येकी एक सदस्य समितीवर घेतला आहे.बैठकीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आम्हाला मान्य नाही. महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरातील दारू दुकाने व बार हटविण्याचा निवाडा देण्यापूर्वी आमचे कोणाचेच म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. आम्हाला नोटीसही दिली गेली नाही. त्यामुळे या धंद्यातील सगळे गोमंतकीय अडचणीत आले आहेत. सरकारने यावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने काही तरी उपाययोजना करावी, अशी संघटनेची मागणी असल्याचे नाईक यांनी सांगितले. येत्या ११ मार्चनंतर जे नवे सरकार अधिकारावर येईल त्या सरकारकडे आम्ही विषयाचा पाठपुरावा करू, असेही नाईक यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)