शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ लैंगिक छळ प्रकरणी 'त्या' रंगेल पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

By वासुदेव.पागी | Updated: September 7, 2023 17:42 IST

गोवा राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाचा तपासानेही वेग घेतला.

पणजी: दोन विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार नोंदविल्यानंतरही इतके दिवस गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत तपास समितीला ठेंगा देत फिरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्धचा तपास अहवाल गोवा विद्यापीठाकडून पोलीस मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे.

या अहवालानंतर पोलीस मुख्यालयातूनही त्या अधिकाऱ्याच्या खात्यांतर्गत चौकशीचा आदेश जारी झाला आहे.इंटर्नशीप करण्यासाठी मुख्यालयात आलेल्या गोवा विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार गोवा विद्यापीठात नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीवर चौकसी न करता हे प्रकरण तसेच पडून राहिले होते. संशयित अधिकारी तपासाला सहकार्य करीत नाही हे कारण देऊन तपास पुढे सरकत नव्हता. मात्र गोवा विद्यापीठातील आणखी एका लैंगिक अत्याचार प्रकरणात प्राध्यापकाचे कारनामे उघडकीस आल्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्याचेही भांडे फुटले आहे.

गोवा राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाचा तपासानेही वेग घेतला. विद्यापीठाच्या अंतर्गत चौकसी समितीपुढे तो अधिकारी चौकशीसाठी हजर राहिला. परंतु आपल्या विरुद्धचे आरोप त्याने फेटाळले आहेत. दरम्यान या समितीने चौकशी अहवाल पूर्ण करून तो गोवा पोलीस मुख्यालयाला सादर केला आहे. या संदर्भात गोवा विद्यापीठाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी म्हटले आहे.

चौकशी समिती नियुक्तया प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्याच्या नेतृत्वाखाली चौकसी समिती नियुत्त करण्यात आली आहे. ही समिती या प्रकरणात तपास करून लवकरच अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करणार आहे. त्यानंतरच त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.