शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत वेळेचा कटाक्ष पाळावाच लागेल - इजिदोर फर्नांडीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 17:56 IST

विधानसभेच्या कामकाजाचे  नियोजन हे वेळेची सांगड घालून  केलेले असते. त्यामुळे सदस्यांना वेळेचे भान राखूनच बोलावे लागते.

वासुदेव पागी

पणजी - विधानसभेच्या कामकाजाचे  नियोजन हे वेळेची सांगड घालून  केलेले असते. त्यामुळे सदस्यांना वेळेचे भान राखूनच बोलावे लागते. त्यासाठी सभागृहाच्या अध्यक्षांना वेळेचा कटाक्ष पाळण्यासाठी बेल वाजवावी लागली तरी ते अनुचित नसल्याचे  गोव्याच्या विधानसभेत नव्यानेच नियुक्त करण्यात आलेले उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

फर्नांडीस यांच्या नावाची उपसभापती म्हणून घोषणा करण्यात आल्यानंतर सभागृहात त्यांचे कौतुक करताना अनेक सदस्यांनी त्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा अशी विनंती केली होती. त्यांनी लवकर बेल वाजवू नये अशी मागणी बऱ्याच सदस्यांनी केली होती. याविषयी विचारले असता फर्नांडीस म्हणाले, एका सदस्याने अधिक वेळ घेतला तर दुसऱ्यालाही किमान तितकाच वेळ द्यावा अशी मागणी होवू शकते. तसे केले तर कामकाज मध्यरात्रीपर्यंत लांबणार. अशाने सभागृहाचे काम चालणार नाही. त्यामुळे वेळेवर नियंत्रण ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी बेल वाजवावी लागली तर ती मारलीच पाहिजे. 

सभापती व उपसभापती पदे ही लोकशाहीच्या मंदिरातील फार मोठ्या जबाबदारी असून उपसभापती पदाचा जबाबदार माझ्यावर सोपविल्यामुळे मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांचा ऋणी आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री असतात तर सभागृहाचे प्रमुख हे सभापती असतात व सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती असतात. त्यामुळे हे पद म्हणजे लोकशाहीच्या एका मोठ्या घटकाची जबाबारी ठरत आहे.’

या पदावर माझी निवड झाल्यानंतर मला माझे अपग्रेडेशन झाल्यासारखे वाटले. याचा अर्थ विधीमंडळ सदस्य म्हणजे कमी महत्तवाचे पद असे मला अजिबात म्हणायचे नाही, परंतु सर्व विधीमंडळ  सदस्यांना त्यांच्या मतदारांच्या हीताच्या दृष्टीने आणि पर्यायाने गोमंतकियांच्या हितासाठी आपल्या समस्या सभागृहात मांडताना योग्य संधी व वातावरण निर्मितीची जबाबदारी माझ्यावर आली आहे असे त्यांनी सांगितले. 

सभागृह चालविण्याची जबाबदारीही सभापतींच्या अनुपस्थित आपल्यावर राहाणार असल्यामुळे त्यावेळी जनतेच्या प्रश्नांना प्रतिनिधी वाट करून देतात हे पाहणे तसेच हे होताना कामकाज नियमांचे पालन करून घेणे हा कटाक्ष राहणार असल्याचे ते म्हणाले. फर्नांडीस हे जरा कडवे परंतु स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या स्वभावाचा कामकाज चालविण्यात कोणताही अडथळा येणार नाही उलट फायदाच होणार असल्याचे ते सांगतात. 

टॅग्स :goaगोवा