शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; इस्त्रायल आणि केनियातील मिळून दोघींना अटक

By किशोर कुबल | Updated: September 9, 2023 00:01 IST

कारवाईत पाच महिलांची सुटका ; सुधारगृहात रवानगी

पणजी: गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा केनिया आणि भारतादरम्यान कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करीचा पर्दाफाश करून इस्त्रायलमधील एक आणि केनियातील एक मिळून दोन महिलांना अटक केली.पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी पत्रकारांना सांगितले की, मारिया डोरकास (इस्रायल) आणि विल्किस्टा अचिस्टा (केनिया) या दोन आरोपींना आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले की 'अर्झ' या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने राज्य पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली.

केनिया आणि भारतादरम्यान चालवल्या जाणाऱ्या रॅकेटचा हणजुण पोलिसांनी पर्दाफाश केल्याचे दळवी यांनी सांगितले.

ते म्हणाले की तरुण, शिक्षित  केनियन महिलांना गोव्यातील तस्करांच्या वतीने काम करणार्‍या एजंटांकडून हॉस्पिटॅलिटी उद्योगात नोकरीचे खोटे आश्वासन देऊन गोव्यात आणण्यात आले. व त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले.भारतात आणल्यानंतर, तस्करांनी महिलांचे पासपोर्ट आणि व्हिसा जप्त केले आणि हिंसाचाराच्या भीतीने त्यांना वेश्याव्यवसायात भाग पाडले.'

दळवी म्हणाले की, मारिया डोरकास आणि विल्किस्टा या तस्कर जोडीचा समावेश असलेला हा रॅकेट मोठ्या प्रमाणात ऑनलाइन कार्यरत होता, ग्राहक मिळवण्यासाठी एस्कॉर्ट वेबसाइटची मदत घेतली जात होती.

पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी बेंगळुरूला नेले जात असताना कारवाईची माहिती एनजीओला समजल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे त्यांनी सांगितले. सुटका करण्यात आलेल्या महिलांना मिरची येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.