शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 20:31 IST

रेंट ए कार, रेंट ए बाइक, रिक्षा, मोटरसायकल पायलट तसेच  खाजगी बसमालकांना आंदोलनात सहभागी होतील आणि संपूर्ण गोवा ठप्प करु, असे आंदोलकांनी म्हटले आहे.

गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी- ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा’, अ‍ॅपधारित टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणीपणजी : गोव्यात टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा’ तसेच अन्य अ‍ॅपधारित टॅक्सी सेवेविरुध्द धरणे आंदोलन सुरु केले आहे. सरकारला दोन दिवसांची मुदत देत अ‍ॅप मोडित न काढल्यास ८ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. रेंट ए कार, रेंट ए बाइक, रिक्षा, मोटरसायकल पायलट तसेच  खाजगी बसमालकांना आंदोलनात सहभागी होतील आणि संपूर्ण गोवा ठप्प करु, असे आंदोलकांनी म्हटले आहे.

अ‍ॅपधारित टॅक्सीसेवा बंद करण्याच्या मागणीपुष्ठ्यर्थ टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी कालपासून येथील आझाद मैदानावर धरणे धरले आहे. आंदोलकांचे नेतृत्त्व करणारे टॅक्सी व्यावसायिक बाप्पा कोरगांवकर यांनी आम्हाला टॅक्सी सेवेसाठी कोणत्याच प्रकारचे अ‍ॅप नको. गोमंतकीयाने काढलेले अ‍ॅपही नको, असे सांगितले. गोवा माइल्स तसेच अन्य अ‍ॅप सेवेत परप्रांतीय आलेले आहेत. एवढी वर्षे भूमिपुत्रांच्या हातात असलेला टॅक्सी व्यवसाय आता त्यांच्या हातातून निसटण्याची भीती निर्माण झालेली आहे, असे ते म्हणाले. अ‍ॅप मोडित काढण्याची मागणी दोन दिवसात सरकारने मान्य न केल्यास वाहतूक क्षेत्रातील अन्य व्यावसायिकांनी एकत्र आणून आंदोलन तीव्र केले जाईल आणि राज्यभर पसरविले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, अन्य एका आंदोलक टॅक्सी व्यावसायिकाने सांगितले की, ‘ अ‍ॅप मोडित काढण्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील. पोलिसांनी अटक केल्यास कोणीही जामिनासाठी अर्ज करणार नाही. आम्ही ‘जेल भरो’ आंदोलन करु. प्रसंगी कुंटुबियांनाही आंदोलनात सहभागी करु, असे तो म्हणाला. सत्ताधारी भाजपचे चार ते पाच आमदार अ‍ॅपधारित टॅक्सीसेवेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्याने केला.

टॅग्स :Taxiटॅक्सीgoaगोवा