शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात शॅकांमध्ये पाणी घुसण्याचे वाढते प्रकार; भरपाई मिळत नसल्याने व्यावसायिक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:25 IST

गोव्यातील किना-यांवर ठिकठिकाणी असलेल्या शॅकमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. सोमवारी मध्यरात्री समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने बागा, कळंगुटसह काही किना-यांवरील शॅकांमध्ये पाणी घुसून हानी झाली. 

पणजी : गोव्यातील किना-यांवर ठिकठिकाणी असलेल्या शॅकमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. सोमवारी मध्यरात्री समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने बागा, कळंगुटसह काही किना-यांवरील शॅकांमध्ये पाणी घुसून हानी झाली. 

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ बागा किना-यावरच तब्बल २0 शॅकांमध्ये पाणी घुसले. कळंगुटसह अन्य किना-यांवरही शॅकमध्ये पाणी शिरले.  ते म्हणाले की, ‘गेल्या १८ आॅक्टोबर रोजी वादळामुळे पाण्याची पातळी वाढून असेच पाणी शॅकांमध्ये शिरले आणि हानी झाली. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी ‘ओखी’ वादळात पाण्याची पातळी वाढली आणि पाणी शॅकांमध्ये शिरल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला.

नैसर्गिक आपत्ती असल्याने अनेकांनी सरकार दरबारी नुकसान भरपाईसाठी दावे केले परंतु त्यांना भरपाई मिळू शकली नाही. पर्यटन खाते शुल्काच्या स्वरुपात भरमसाट पैसे घेते. ६५ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. परंतु अशाआपत्तीच्यावेळी काहीच भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाईसाठी सरकारचे निकष तरी काय, हे स्पष्ट व्हायला हवे. 

पर्यटक संख्या घटली : कार्दोझदर वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात पर्यटकांची संख्या कमी आहे, याचे कारण मलेशिया, श्रीलंका, सिंगापूरमध्ये स्वस्तात पर्यटन उपलब्ध झाले आहे. गोव्यात तुलनेत महागाई आहे त्यामुळे पर्यटक पाठ फिरवतात. दुसरी बाब म्हणजे पर्यटकांच्या बाबतीत गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात वाढलेले आहे. अलीकडेच काणकोण येथे विदेशी महिलेवर बलात्कार झाला. अशा अन्य घटनाही गेल्या काही काळात घडलेल्या आहेत त्यामुळे वाईट प्रतिमा निर्माण झालेली आहे, असे क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले. 

‘हा परिणाम त्सुनामीचा नसावा’ राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ शास्रज्ञ बबन इंगोले यांच्या मतें इंडोनेशियातील त्सुनामीचा हा परिणाम नसावा कारण त्सुनामीला दोन दिवस उलटून गेले आहेत. पूर्व किनारपट्टीवर वादळी वा-यामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. पौर्णिमेचे दिवस असल्याने समुद्राला भरती आहे. अशा वेळी कुठेतरी वादळाचा तडाखा बसल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर कुठेतरी पर्जन्यवृष्टीही होत असते. अलीकडच्या काळात पाण्याची पातळी वाढण्याचे प्रकार वाढलेले आहेत.  

टॅग्स :goaगोवा