शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

होंडा परिसरात पोलीस गस्त वाढवा

By admin | Updated: September 14, 2015 02:03 IST

होंडा : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रात अवघ्या आठ दिवसांत भरदिवसा दोनवेळा धाडसी चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे

होंडा : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रात अवघ्या आठ दिवसांत भरदिवसा दोनवेळा धाडसी चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यासाठी पर्ये भाजपाचे युवा नेते तथा खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष विश्वजीत कृ. राणे यांनी रविवारी (दि.१३) पर्ये मतदारसंघातील सरपंच, पंच, वाळपई पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन होंडा व इतर भागात वाढत चाललेली परप्रांतीयांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आखावी. त्याचबरोबर परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी केली. बैठकीस वाळपई पोलीस स्थानकातर्फे पोलीस उपनिरीक्षक शिरोडकर, हवालदार अनिल हजारे, होंडा सरपंच उर्मिला माईणकर, उपसरपंच उल्हास गावडे, केरीचे पंच जिवबा राणे, मोर्ले सरपंच सुशांत पास्ते व पंचसदस्य उपस्थित होते. या भागात अवघ्या आठ दिवसांत दोन चोरीच्या घटना घडल्या. हा गंभीर विषय असून पोलिसांनी कसून चौकशी करून दोन्ही चोरी प्रकरणांचा छडा लावावा. त्याचप्रमाणे दोन दिवसांनंतर गणेश चतुर्थी आहे. त्या वेळी होंडा व परिसरात राहणारे स्थानिक मूळ गावी किंवा घरी जाणार आहेत. त्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, असे राणे यांनी सांगितले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक शिरोडकर म्हणाले, नागरिकांनी भाडेकरू ठेवताना त्यांची माहिती कायद्यानुसार सात दिवसांच्या आत स्थानिक पोलीस चौकीवर देणे गरजेचे आहे. तसेच माहिती न दिल्यास संबंधित घरमालकांवर गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. उर्मिला माईणकर यांनी वाळपई पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन मतदारसंघ येतात. त्यासाठी सरकारने वाळपई पोलीस स्थानकाला आणखी दोन पीसीआर वाहने पुरवावीत, अशी मागणी केली. (वार्ताहर)