शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...! एका महीन्यात ३५० डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळले

By पंकज शेट्ये | Updated: September 30, 2023 19:33 IST

मुरगाव तालुक्यातील चिखली उपजिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात लोकांची डेंग्यूबाबत केलेल्या ‘एनएस१’ तपासणीत ३५० लोकांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे उघड झाले आहे.

वास्को: ऑगस्ट महीन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली असलीतरी, ह्या महीन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुरगाव तालुक्यातील चिखली उपजिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात लोकांची डेंग्यूबाबत केलेल्या ‘एनएस१’ तपासणीत ३५० लोकांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे उघड झाले आहे.

गोव्याच्या इतर भागाबरोबरच मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यू झालेले रुग्ण काही दिवसापासून वाढत असल्याने लोकात तो चिंतेचा विषय बनला आहे. मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, वास्को, दाबोळी आणि मुरगाव अशा चारही मतदारसंघातील विविध भागातून डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळत असल्याची माहीती चिखली उपजिल्हा इस्पितळातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. ऑगस्टात चारही मतदारसंघातील विविध भागातून आलेल्या नागरिकांपैकी सुमारे ३९० जणांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे चिखली उपजिल्हा रुग्णालयात केलेल्या ‘एनएस१’ चाचणीतून उघड झाले होते अशी माहीती इस्पितळातील सूत्रांकडून मिळाली. सप्टेंबर महिन्यात मुरगाव तालुक्यातील विविध भागात आढळणाऱ्या डेंग्यू सदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या थोडी कमी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात चिखली उपजिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी आलेल्यांपैंकी सुमारे ३५० जणांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे चाचणीतून उघड झाल्याची माहीती मिळाली.

मुरगाव तालुक्यातील वाडे, नवेवाडे, झुआरीनगर, खारीवाडा, बायणा इत्यादी भागातून सप्टेंबर महिन्यात इतर भागापेक्षा जास्त डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याची माहीती चिखली उपजिल्हा इस्पितळ आणि वास्को शहरी आरोग्य केंद्रातील सूत्रांकडून मिळाली. तसेच सडा, मांगोरहील, आदर्शनगर इत्यादी भागातून कीरकोळ प्रमाणात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याची माहीती मिळाली. सप्टेंबर महिन्यात चिखली उपजिल्हा रुग्णालयात सुमारे ३५० डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून आलेले असून त्या व्यतिरिक्त मुरगाव तालुक्यातील खासगी रुग्णालयातसुद्धा डेंग्यू सदृश्य तापाचे अनेक रुग्ण आढळून आल्याची माहीती मिळाली.

डेंग्यू सदृश्य तापाचे सप्टेंबर महिन्यात आढळून आलेल्या रुग्णापैंकी बहुतेकांवर उपचार होऊन ते बरे झाले आहेत तर काहींवर उपचार चालू आहेत. मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यूचे प्रमाण वाढूनये यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्र, मुरगाव नगरपालिका आणि इतर संबंधित आस्थापने विविध पावले उचलीत असल्याची माहीती मिळाली. त्यासाठी मुरगाव तालुक्यातील विविध भागात औषधांची फव्वारणी करणे, मोहीम राबवून ज्याठीकाणी पाणी साचलेले आहे (बॅरलात आणि इतर वस्तूत) ते खाली करणे अशा प्रकारची विविध पावले उचलण्यात येत असल्याची माहीती मिळाली. 

टॅग्स :dengueडेंग्यूgoaगोवा