शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गोव्यात १० ठिकाणी होते बेकायदा रेती उपसा; हायकोर्टकडून पोलिसांची खरडपट्टी

By वासुदेव.पागी | Updated: December 6, 2023 16:14 IST

या संदर्भात न्यायालयाने पोलीस महासंचालकांना आणि राज्याचे मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.  

पणजी : राज्यात १० ठिकाणी बेकायदेशीर रेती उपसा सुरू असल्याचे  पणजी उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाच्या निदर्शनास आल्यानंतर  खंडपीठाने आज पोलिसांची चांगलीच खरडपट्टी केली.   पोलिस याकडे का  डोळे झाक करतात असा प्रश्न खंडपीठाने केला आहे.

या संदर्भात न्यायालयाने पोलीस महासंचालकांना आणि राज्याचे मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.  याच आठवड्यात बैठक घेऊन संबंधित प्रकार बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितली आहे. बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी  काय कृती करणार,याची माहिती  १२ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रातून खंडपीठाला देण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला आहे.  

गोव्यात  अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात २०१८ मध्ये ‘गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर्स नेटवर्क’ या संघटनेने याचिका सादर केली होती. राज्य सरकार, खाण, वाहतूक, पोलीस, कॅप्टन ऑफ पोर्टचे कप्तान यांना या याचिकेत प्रतिवादी केले होते. १८ डिसेंबर २०१९ रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका निकालात काढत संबंधित खात्यांना बेकायदेशीर रेती व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचे आढळून आले आहे.

अवैध रेती उपसा रोखण्यासाठी गस्ती बोटी देण्यात येतील असे यापूर्वी प्रतिज्ञापत्रात प्रशासनाने खंडपीठाला सांगितले होते. त्या अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. या गस्ती बोटींचे काय झाले याचे सिपष्टीकरणही खंडपीठाने मागितले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवा