शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा घरे लवकरच कायदेशीर

By admin | Updated: July 31, 2015 02:04 IST

पणजी : राज्यातील बेकायदा घरे निश्चितच कायदेशीर केली जातील. त्यासाठी सरकार शुल्क लागू करील. आम्ही कृती योजनाही तयार केली आहे,

पणजी : राज्यातील बेकायदा घरे निश्चितच कायदेशीर केली जातील. त्यासाठी सरकार शुल्क लागू करील. आम्ही कृती योजनाही तयार केली आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. काही लोकांनी स्वत:च्या जागेत बेकायदा बांधकामे केली आहेत. काहीजणांनी कुळांच्या जमिनीत बेकायदा घरे बांधली आहेत. काहीजणांनी कोमुनिदाद जमिनीत किंवा आफ्रामेन्तमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. अशा प्रत्येक बेकायदा बांधकामाची आम्ही वर्गवारी करू. ज्यांनी स्वत:च्या जमिनीत बेकायदा घरे बांधली आहेत, अशी बांधकामे पहिल्या वर्गात येतील. ती लवकर कायदेशीर केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळीच बांधकामे कायदेशीर केली, तर परप्रांतीयांनाच त्याचा लाभ मिळेल, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले. परप्रांतीयांची बांधकामे कायदेशीर करू नका. लोक बेकायदा घरे का बांधतात, हे सरकारने अगोदर जाणून घ्यावे. लोकांना भू-रूपांतर सनद वगैरे देण्यास खाती खूप टाळाटाळ करतात. स्वत:च्या जमिनीतही लोकांना घरे बांधण्यासाठी अत्यंत किचकट प्रक्रिया पार पाडावी लागते. सरकारचा प्रादेशिक आराखडाही तयार नाही, असे राणे म्हणाले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी भू-रूपांतर सनद आणि बांधकामाविषयीची प्रक्रियाही सुलभ व सुटसुटीत बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले. समांतरपणे ते कामही सुरू आहे व त्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथकही सरकारने नियुक्त केले आहे. प्रश्नोत्तराच्या तासावेळी हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी याबाबतचा मूळ प्रश्न मांडला होता. राज्यभर सरकारच्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. या जमिनींचा दर किती आहे, हे सरकारने कधी पाहिले आहे काय, अशी विचारणा आमदार टिकलो यांनी केली. पूर्ण राज्यातील ज्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण झाले आहे, त्या सगळ्या जमिनींचे मूल्यांकन करायला खूप वेळ लागेल, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. अतिक्रमण झालेल्या अनेक जमिनी या शंभर चौरस मीटरपेक्षाही कमी क्षेत्रफळाच्या आहेत. अशी बांधकामे कायदेशीर व्हायला हवीत, असे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)