शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीकडे दुर्लक्ष; जीसीएची नवी समिती नियुक्त

By admin | Updated: June 24, 2015 01:27 IST

पणजी/पर्वरी : गोवा क्रिकेट असोसिएशनवर ताबा मिळविण्यासाठी सारे नीतीनियम धाब्यावर बसविण्याची मालिका अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी चालूच ठेवली

पणजी/पर्वरी : गोवा क्रिकेट असोसिएशनवर ताबा मिळविण्यासाठी सारे नीतीनियम धाब्यावर बसविण्याची मालिका अध्यक्षडॉ. शेखर साळकर यांनी चालूच ठेवली असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्यायग्रस्त क्लबांतर्फे बाजू मांडणारे अ‍ॅड. सुबोध कंटक व अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी या दोघांनीही आज पुन्हा संघटनेने निवडणूक प्रक्रियेत कोणतेच नियम पाळले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.आश्चर्याची गोष्ट म्हणजे न्यायालयात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सुनावणी चालू असतानाही मंगळवारी डॉ. शेखर साळकर यांनी निवडणूक समिती नव्याने स्थापन करून आपल्या प्रमुख विरोधकांचे निवडणूक अर्ज फेटाळून लावले. मुळात निवडणूक समिती सचिवांनी स्थापन करायची असते; परंतु दुपारी तीन वाजता अध्यक्षांनी स्वत:च एक ठराव मांडून समिती स्थापन केली व त्या समितीने अर्जांची छाननी केली. त्यात अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार व साळकर यांचे विरोधक चेतन देसाई यांचा अर्ज एक किरकोळ कारण देऊन फेटाळण्यात आला.न्यायमूर्ती एफ.एम. रेइश आणि न्यायमूर्ती के. एल. वधाने यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. नवी त्रिसदस्यीय निवडणूक समिती नेमल्याची माहिती जीसीएचे मुंबईहून खास आणलेले वकील श्याम दिवाण यांनी न्यायालयाला दिली. पणजी जिमखानाचे अरुण तळावलीकर, तसेच सेंच्युरी क्लबचे सचिव राजेश आमोणकर या दोन नव्या व्यक्तींना निवडणूक समितीवर घेण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया ३0 मे रोजी सुरू झालेली आहे आणि नियमानुसारच ती चालली आहे. अगरवाल यांना न्यायालयाने हटविल्यानंतर तसेच मनोज बांदोडकर यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक समिती अस्तित्वातच राहिलेली नाही, हा दावा विरोधक करीत असले तरी तो निरर्थक आहे. जीसीएने ठराव घेऊनच नवी पूर्णवेळ निवडणूक समिती दिलेली आहे, असे न्यायालयास सांगितले. लेटरहेड किंवा त्यावरील कोणत्याही सह्यांबाबत कोणीही याआधी आक्षेप घेतलेला नव्हता, असा दावा त्यांनी केला. नव्या निवडणूक समितीकरवी चेतन देसाई यांचा अध्यक्षपदाचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. रजनीकांत लावणीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी तीन सदस्यीय निवडणूक समिती नेमण्यात आली असून अर्जांच्या छाननीअंती आता अध्यक्षपदासाठी तिघेजण रिंगणात उरले आहेत. या समितीने मंगळवारी बैठक घेऊन उमेदवारी अर्जांची छाननीही केली. अध्यक्षपदासाठी १0 अर्ज आले होते पैकी केवळ ३ ग्राह्य धरण्यात आले. चेतन देसाई यांनी उमेदवारी अर्जावर स्वत:च्या क्लबचे नाव चुकीचे लिहिले, तसेच स्वत: अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला असताना दुसऱ्याचे नाव उमेदवारीसाठी सुचविले या दोन कारणावरून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. देसाई यांच्या क्लबाचे नाव सनी स्पोर्स्ट्स क्लब असे असताना त्यांनी अर्जावर सनी क्रिकेट क्लब असे लिहिले त्यास आक्षेप घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी साळकर तसेच राजेश पाटणेकर आणि विनोद उर्फ बाळू फडके असे तीनच अर्ज उरले आहेत.कार्यकारी सदस्यपदांसाठी ५५ पैकी ४१ अर्ज ग्राह्य धरण्यात आले. सय्यद मजीद, आनंद नाईक, दया पागी, नामदेव फडते, मंदार फडते आदींचे अर्ज तांत्रिक कारणावरून फेटाळण्यात आले असून सदस्यपदासाठी पंकज नाईक, सुभाष फळदेसाई, व्यंकटेश प्रभूदेसाई व डॉ. साळकर यांचे अर्ज राखून ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)