शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल यंदा एप्रिलमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 02:28 IST

पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा मे ऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर

पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा मे ऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी स्पर्धात्मक परीक्षा देता याव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शक्य झाले नाही तर शेवटच्या आठवड्यात मात्र निश्चितच निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती विशेष सूत्रांनी दिली. यंदा निकाल लवकर जाहीर करण्यासाठी सर्व कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पेपर तपासण्यापासून निकाल बनविण्यापर्यंतची सर्व कामे अधिक गतीने केली जातील, यासाठी विशेष नियोजन केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. दहावीचा निकाल मात्र दरवर्षीप्रमाणे मे मध्येच जाहीर केला जाईल. त्याबाबतीत वेळेत बदल केला जाणार नाही.बारावीचा निकाल लवकर लागणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना अन्यथा अडचण होते. स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांनाही त्यांना बसणे तसेच पसंतीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविणेही सोयीचे व्हावे यासाठी निकाल एप्रिलमध्येच जाहीर करण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. यापूर्वीही बारावीचा निकाल अगोदर जाहीर करण्याचे प्रयत्न झाले होते; परंतु त्याला यश न आल्यामुळे ठरल्याप्रमाणेच मे मध्येच निकाल जाहीर करावा लागला होता. आता शालान्त मंडळ जास्त गंभीर झालेले आहे. दरम्यान, १ मार्चपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षा या १५ मार्च रोजी संपणार आहेत. यंदा या परीक्षेत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढताना १६ हजार ९०२ विद्यार्थी बसले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी १२००ने अधिक आहेत. इयत्ता आठवीपर्यंत अनुत्तीर्ण (नापास) न करण्याचे धोरण सुरू झाल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यंदाची विक्रमी संख्याही नापास न करण्याच्या धोरणाचाच परिणाम असल्याचे शालान्त मंडळाकडून सांगितले जाते.