शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात प्रशासनाचे वरातीमागून घोडे

By admin | Updated: October 12, 2016 06:28 IST

गोवा हे पर्यटकांना ३६५ दिवसही विहार करण्याजोगे जागतिक दर्जाचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे पर्यटकांची गोव्यात सतत वर्दळ सुरूच असते. मात्र

प्रसाद म्हांबरे / पणजीगोवा हे पर्यटकांना ३६५ दिवसही विहार करण्याजोगे जागतिक दर्जाचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे पर्यटकांची गोव्यात सतत वर्दळ सुरूच असते. येथील समुद्र किनारे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. पावसाळ््यानंतर समुद्र किनारे पर्यटकांसाठी खुले होतात, मात्र हंगाम सुरू झाल्यानंतरही अजून प्रशासनाने पुरेशा सुविधा पुरविलेल्या नाहीत. शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी झालेली नाही.पर्यटकांच्या सोयीसाठी किनाऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या शॅकचे वितरण सरकारने केलेले नाही. शॅक वितरणाला १५ आॅक्टोबरला सुरुवात होईल. त्यानंतर उभारणीसाठी किमान १५ दिवस लागतील. यंदा चांगला पाऊस झाल्याने किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर झिज झाली. त्यांचे पुर्नवसन करून पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. किनाऱ्यांवर अनेक ठिकाणी वाळू वाहून गेली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची योग्य ती व्यवस्था नाही. सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सुविधा तसेच किनाऱ्यांवर योग्य प्रमाणात वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. गोव्यात देशी पर्यटकांची वर्दळ १२ महिने असते. हे देशी पर्यटक किनाऱ्यांबरोबर निसर्गाचाही आस्वाद घेतात. विदेशातून चार्टर्ड विमानातून येणारे पर्यटन आॅक्टोबरच्या पहिल्याच दिवशी गोव्यात दाखल झालेत. त्यात रशिया तसेच इतर देशातल्या पर्यटकांचा समावेश आहे. मात्र त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत. किनाऱ्यांवरील जीवरक्षकांच्या मदतीला किमान हंगामात तरी सुरक्षा दल गरजेचे आहे.