शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

होबळे यांना लवादाचा दिलासा

By admin | Updated: September 12, 2015 02:10 IST

पणजी : पाटो-रायबंदर येथील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटशी निगडित बेकायदा बांधकाम मोडण्याचा आदेश

पणजी : पाटो-रायबंदर येथील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटशी निगडित बेकायदा बांधकाम मोडण्याचा आदेश देण्याबरोबरच या रेस्टॉरंटचे मालक अनिल होबळे यांच्याकडून २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचा गेल्या २९ मे रोजी राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिला होता. तथापि, शुक्रवारी (दि. ११) लवादाने २० लाखांच्या वसुलीस स्थगिती दिली आहे. तसेच त्या जागेत आणखी बेकायदा बांधकाम असल्यास लवादाचा पुढील निवाडा होईपर्यंत ते जैसे थे स्थितीत ठेवले जावे, असा आदेश लवादाने दिला आहे. अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स हे या प्रकरणी तक्रारदार आहेत. होबळे यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयास एक याचिका सादर केली होती. हरित लवादासमोर ज्यादा कागदपत्रे सादर करून फेरविचार याचिका सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने होबळे यांना परवानगी दिली होती. त्यानुसार न्यायालयासमोरील याचिका होबळे यांनी मागे घेतली व राष्ट्रीय हरित लवादाकडे फेरविचार याचिका सादर केली. आपल्या रेस्टॉरंटशी निगडित जो भाग बेकायदा होता, तो जीसीझेडएमएने पाडला आहे, असे होबळे यांचे म्हणणे आहे. खारफुटीची कत्तल करून होबळे यांनी बांधकाम केल्याचे रॉड्रिग्स यांचे म्हणणे होते. पर्यावरणाची हानी केल्याने २० लाखांचा दंड भरावा, असे गेल्या २९ रोजी दिलेल्या आदेशाद्वारे लवादाने स्पष्ट केले होते. तथापि, होबळे यांच्या फेरविचार याचिकेच्या अनुषंगाने लवादाने शुक्रवारी वीस लाखांच्या दंडाच्या वसुलीस स्थगिती दिली. येत्या १६ आॅक्टोबर रोजी याबाबत पुढील सुनावणी होणार आहे. जीसीझेडएमएने आपल्या २९ मेच्या निवाड्याची किती अंमलबजावणी केली व किती बांधकाम पाडले ते आपल्याला ठाऊक नाही. त्याबाबतची छायाचित्रेही आपल्यासमोर आलेली नाहीत. त्याबाबतचे चित्र जीसीझेडएमएनेच स्पष्ट करावे, असे लवादाने म्हटले आहे. तसेच आणखी बांधकाम पाडायचे असल्यास आपला पुढील आदेश होईपर्यंत जै से थे स्थिती ठेवावी, असे लवादाने म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)