शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवर दोघांनाही हेल्मेटसक्ती

By admin | Updated: August 1, 2014 01:48 IST

पणजी : दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

पणजी : दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. रेल्वे जाळे विस्तारून मडगाव-फोंडा, थिवी-वाळपई व सावर्डे-फोंडा असे नवीन रेल्वेमार्ग तयार करून स्थानिक वाहतुकीचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली. वाहतूक खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मोटर वाहन कायद्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीचे आहे. फक्त या कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती, ती आता कडकपणे होणार आहे. म्हापसा, पेडणे, माशेल येथे नवी बसस्थानके, फोंडा येथे ट्रक टर्मिनल येणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. मडगाव शहराचा वाहतूक आराखडा चतुर्थीनंतर निश्चित होईल आणि डिसेंबर-जानेवारीपासून कामे सुरू होतील, वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी फोंड्यानजीक ड्रायव्हिंग ट्रॅकही येईल, असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी कपात सूचना मांडताना वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले. दुचाक्यांवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्तीचे करावे, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, अनेक युवकांचे अपघातांमध्ये बळी जात आहेत. थरारक स्टंट केले जातात. अशा युवकांवर नजर ठेवायला हवी. रस्ते ट्रॅफिक उजव्या बाजूला व फास्ट ट्रॅफिक डाव्या बाजूला अशी व्यवस्था केल्यास अपघात टळू शकतात, असे ते म्हणाले. नव्या जुवारी पुलाची नितांत गरज असून तो लवकरात लवकर बांधावा. जुन्या पुलावर अवजड वाहनांची बंदी काटेकोरपणे पाळावी, असे ते म्हणाले. आमदार दिगंबर कामत यांनी वाहनसंख्या १० लाखांवर पोचल्याने आणखी अपघातांचे प्रमाण वाढले आहे याकडे लक्ष वेधले. काळ््या काचांच्या वाहनांवर कारवाई होत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणली जात नाही, असे ते म्हणाले. आमदार मायकल लोबो यांनी टुरिस्ट टॅक्सीचालकांचा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. आरटीओ अधिकाऱ्यांनी पर्यटक वाहने अढवून त्यांना त्रास करू नये, असे आवाहन त्यांनी केले. आमदार माविन गुदिन्हो यांनी अपघातांचा विषय उपस्थित करून चालकाच्या चुकीमुळे अपघातात एखाद्याचा मृत्य ओढवलेला असल्यास तीन वर्षांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करावा, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)