शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता ८ वीतील गुंजन नार्वेकरचा विक्रम! ६२ तासांत तीन शिखरे केली सर  

By समीर नाईक | Updated: July 27, 2023 18:24 IST

गुंजन ही पर्वरीतील ज्ञान विकास विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे.

पणजी (गोवा) : पर्वरी येथील गुंजन पंकज प्रभू नार्वेकर या १२ वर्षीय मुलीने लदाख येथील मर्खा व्हॅली भागातील माउंट कांग येतसे-२ (६२५० मीटर), माउंट रेपोनी मल्लारी-१ (६०९७ मीटर) आणि माउंट रेपोनी मल्लारी-२ (६११३ मीटर) अशी तीन शिखरे ६२.५ तासात यशस्वीरीत्या पूर्ण करत जागतिक स्तरावरील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी १३ वर्षीय मुलाने २ शिखरे सर करण्याचा विक्रम केला होता, पण तीने ३ शिखरे सर करत हा विक्रम मोडला आहे.

गुंजन ही पर्वरीतील ज्ञान विकास विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे. गुजनने वरील तीन शिखर ४९तासात पूर्ण केले. पण बेसकॅम्प ते तीन शिखर आणि पुन्हा बेसकॅम्प असा हा प्रवास करायला तीला ६२.५ तास लागले. महत्वाचे म्हणजे तीने सर केलेले  तीन शिखरे ही ६००० मीटरपेक्षा जास्तच आहे. यापूर्वी गुंजनने ८ दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक, मनाली येथील माऊंट फ्रेंडशिप पीक (५२८० मीटर) आणि लडाख भारतातील गोठलेल्या झांस्कर नदीवरील चद्दर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. गुंजनला जलद चद्दर ट्रेक पूर्ण करणारी सर्वात कमी वयाची मुलगी म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मान्यता मिळाली आहे.

१५ जुलै रोजी माउंट कांग येतसे-२, माउंट रेपोनी मल्लारी-१ आणि माउंट रेपोनी मल्लारी-२ या ट्रेकिंगला सुरुवात केली आणि २१ जुलै रोजी फक्त सात दिवसांच्या कालावधीत मी हे तीन शिखर सर केले. बेस कॅम्प ते शिखरापर्यंतचा प्रवास खूपच थकवणारा होता कारण शिखरावर पोहोचण्यासाठी आणि परत जाण्यासाठी १२ ते १४ तास सतत चढाई करावी लागली. हा पराक्रम करण्यासाठी मी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले.  - गुंजन नार्वेकर

टॅग्स :goaगोवा