शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

गोव्यात जीएसटी महसूल घटला, राज्य सरकारची आर्थिक कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 15:10 IST

GST : गेल्या महिन्यात (फेब्रुवारी) गोव्यातील जीएसटी महसूल ५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगेल्या महिन्यात (फेब्रुवारी) गोव्यातील जीएसटी महसूल ५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. जानेवारीतील जीएसटी वाढण्याचे कारण म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे तीन महिने गोव्यात पर्यटनाची धूम असते.केंद्राच्या धोरणानुसार जीएसटी १४ टक्क्यांच्या खाली गेला की पुढील एक-दोन वर्षे केंद्राकडून भरपाई चुकत नाही.

पणजी : गोव्यात जीएसटी महसूल घटत चालला असून दुसरीकडे केंद्राकडूनही वेळेवर भरपाई मिळत नसल्याने मोठी आर्थिक कसरत राज्य सरकारला करावी लागत आहे. जीएसटी भरपाईचे १७३ कोटी रुपये केंद्राकडून येणे आहेत. गोव्याच्या आर्थिक स्तरावर जीएसटीचे गणित अजून जुळलेले नाही, हे यावरून दिसून येते.

गेल्या महिन्यात (फेब्रुवारी) गोव्यातील जीएसटी महसूल ५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. ६७ कोटी रुपये महसूल कमी झालेला आहे. केंद्राच्या धोरणानुसार जीएसटी १४ टक्क्यांच्या खाली गेला की पुढील एक-दोन वर्षे केंद्राकडून भरपाई चुकत नाही. गोव्यात आतापर्यंतचे जीएसटी महसूल संकलन ४० टक्के निगेटिव्ह दाखवते. जानेवारीत थोडेसे डोके वर काढले त्यामुळे भरपाईच्या चौकटीत हा महिना आला नाही. गेल्या वर्षाच्या (२०१९) जानेवारीच्या तुलनेत या जानेवारीतील जीएसटी ३५ टक्क्यांनी वाढला होता परंतु फेब्रुवारी तो वाढ सोडाच, उलट पाच टक्‍क्‍यांनी घटला.

जानेवारीतील जीएसटी वाढण्याचे कारण म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे तीन महिने गोव्यात पर्यटनाची धूम असते. त्यामुळे मोठी उलाढाल असते. दरम्यान, राज्य सरकारने या तीन महिन्यांच्या काळात सर्व प्रकारच्या वाहनांवरील रस्ता करात ५० टक्के सवलत दिल्याने खपही वाढला. त्याचा परिणाम म्हणून जानेवारी महिन्यात जीएसटीचे उत्पन्न वाढल्याचे दिसून आले. परंतु फेब्रुवारीत ते घपकन खाली आले. 

गेले वर्ष अखेर सरकारला केंद्र सरकारकडून जीएसटी भरपाईपोटी २३२ कोटी रुपये येणे होते. परंतु त्यातील केवळ १३२ कोटी रुपये आले.  दुसरी गोष्ट म्हणजे  गेली अनेक वर्षे आयुकपदी राहीलेले दीपक बांदेकर यांना सरकारने अचानक या पदावरून हटवून नवीन अधिकारी आणलेला आहे. जीएसटीचे हे गणित या नवीन अधिकाऱ्याच्या अंगवळणी पडण्यासाठी अजून काही महिने लागतील. 

३५००० डीलर्सची नोंदणीदरम्यान, आतापर्यंत  नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणपणे ४९०० डीलर्स कंपोझिशन योजनेचा लाभ घेत आहेत. जे डीलर्स जीएसटी भरण्याचे टाळतात त्यांना वाणिज्य कर खात्याकडून नोटीसा  पाठवल्या जातात. वसुलीच्या बाबतीत या डीलर्सवर कडक कारवाई केली जाणार आहे. 

श्वेतपत्रिकेची मागणीसरकारने कर्जाचे डोंगर केल्याची टीका  करीत राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतरच्या आर्थिक स्थितीची सरकारने विनाविलंब श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. आर्थिक बेशिस्तीमुळे राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत असून २0२२ पर्यंत आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

 प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘२०२२ पर्यंत सरकारचे ७० टक्के कर्ज देय आहे. कर्ज फेडण्यासाठी पैसे नसतील आणि आर्थिक आणीबाणी निर्माण होईल. राज्यात आज प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर दीड लाख रुपये कर्ज आहे. जन्माला येणारे प्रत्येक मूल दीड लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन जन्माला येत आहे. दोन वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या डोक्यावर १ लाख रुपये कर्ज होते ते ५0 हजारांनी वाढले. राज्याचे एकूण कर्ज २०,४८५ कोटींवर पोचले आहे. गेल्या सात वर्षात भाजप सरकारच्या काळातच ११ हजार कोटींनी कर्ज वाढले. कर्जे काढून सरकारची उधळपट्टी चालू आहे. कर्जाच्या २० टक्केदेखिल रक्कम भांडवल निर्मितीसाठी होत नाही. दैनंदिन खर्चासाठी कर्जे काढण्याची पाळी सरकारवर आली आहे.’

टॅग्स :GSTजीएसटीgoaगोवा