शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव, गोव्यात कार्निव्हलच्या आयोजनास विरोध वाढला

By महेश गलांडे | Updated: February 6, 2021 13:32 IST

कार्निव्हल हे पर्यटकांसाठीही आकर्षण असते. कारण कार्निव्हल मिरवणुकीत शेकडो रंगीबेरंगी चित्ररथ सहभागी होतात व शेकडो कलाकारही त्यात  भाग घेतात.

पणजी : कोविड संकट काळात  कार्निव्हलचे आयोजन कशाला करायला हवे असा प्रश्न विचारत सध्या  विरोधी घटक कार्निव्हलच्या आयोजनास विरोध  करू लागले आहेत. सरकारवर टीकाही होत आहे. पण, सरकारी यंत्रणा व राज्यातील पालिका कार्निव्हलचे आयोजन करण्यावर ठाम आहेत. येत्या १३ फेब्रुवारीपासून गोव्यात कार्निव्हलला आरंभ होत आहे. गोव्यात पोर्तुगीजांची राजवट होती, त्यावेळपासून कार्निव्हल आयोजित केला जातो.  खा, प्या व  मजा करा असा, संदेश देणाऱ्या किंग मोमोची राजवट कार्निव्हलच्या काळात गोव्यातील शहरांमध्ये असते असे मानले जाते. 

कार्निव्हल हे पर्यटकांसाठीही आकर्षण असते. कारण कार्निव्हल मिरवणुकीत शेकडो रंगीबेरंगी चित्ररथ सहभागी होतात व शेकडो कलाकारही त्यात  भाग घेतात. सरकारचे पर्यटन खाते कार्निव्हच्या आयोजनात भाग घेत असते. मात्र, कोविड संकट काळात कार्निव्हल नको अशा प्रकारचे मत  विरोधी  आमदारांपैकी काहीजण व्यक्त करू लागले आहेत. पणजीसह अन्य शहरांमध्ये कार्निव्हल मिरवणुकीवेळी वाहतुकीचेही प्रश्न निर्माण होतात.  त्यामुळेही  कार्निव्हल नको अशा प्रकारची भूमिका अनेकजण घेतात. कार्निव्हल हा ख्रिस्ती धर्मियांचाच सण आहे अशा प्रकारचे चुकीच चित्र काहीजण पूर्वी उभे करत होते. चर्च संस्थेने कार्निव्हलशी आपला काही संबंध नाही असे यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. कार्निव्हलमध्ये पूर्वी थोडी अश्लिलता यायची, ती आता राहिलेली नाही.

कार्निव्हल हा केवळ कमिशन खाण्यासाठी काहीजणांना हवा आहे अशा प्रकारची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. पणजीचे माजी  महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनीही यंदा प्रथमच कार्निव्हलला आक्षेप घेतला आहे. पणजीत चार दिवस कार्निव्हलनिमित्त विविध कार्यक्रम होतील असे महापौर उदय मडकईकर यांनी जाहीर केले. मात्र कार्निव्हलवेळी सोशल डिस्टनसींग पाळले जात नाही व मास्कचाही वापर केला जात नाही, त्यामुळे कार्निव्हलला आपला आक्षेप आहे असे सुरेंद्र फुर्तादो म्हणाले.

दरम्यान, कार्निव्हल रद्द करा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे. लांगूलचालन आणि  कमिशनसाठी लोकांचे जीव धोक्यात घालू नका, असे वेलिंगकर म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा