शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सरकार घर बांधून देणार: मुख्यमंत्री सावंत, आसगावला भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2024 13:05 IST

आगरवाडेकर कुटुंबीयांना ग्वाही, मुख्य सचिवांमार्फत चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा/शिवोली: आसगावमधील आगरवाडेकर कुटुंबीयाचे घर बुलडोझर व बाऊन्सरचा वापर करून परप्रांतीय बिल्डरांनी मोडून टाकल्यामुळे राज्यात संतप्त भावना आहे. या प्रकरणात काँग्रेससह सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. भाजपचे आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो यांनीही मूख्य सूत्रधाराला अटक न झाल्यास पोलिस ठाण्यात ठाण मांडू असा इशारा दिला असतानाच काल, मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी तातडीने आसगावाला भेट दिली.

यावेळी त्यांनी आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सरकारकडून घर बांधून देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्याचे पैसे संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचेही सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता मुख्य सचिवांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आगरवाडेकर यांच्या घराची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार मायकल लोबो व डिलायला लोबो उपस्थित होते. घडलेल्या प्रकारांबाबत आगरवाडेकर कुटुंबाशी चर्चा केली. पुढील दोन दिवसांत सार्वजनिक बांधकाम खाते दुरुस्ती हाती घेईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना लवकरच अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला जाणार आहे. तसेच मुख्य सचिव गुंतलेल्या सर्वांची चौकशी करणार आहेत. 

सचिवांच्या चौकशी अंती अहवाल सादर झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. यात पोलिसांचा हात असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करू तसेच अधिकारी असल्यास त्यांचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

ज्या पद्धतीने घरावर कारवाई झाली ती पद्धत अत्यंत चुकिची होती. ज्या व्यक्तीने ही जागा खरेदी केल्याचा दावा केला होता त्यांनी न्यायासाठी न्यायसस्थेमार्फत मागणी करणे योग्य ठरले असते. अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या कारवाई करणे चुकिचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी आपण दिल्लीत होतो. डिलायला लोबो यांनी प्रकाराची माहिती आपल्याला फोनवरून दिली. दिल्लीतून परतल्यावर पूर्ण माहिती करुन घेतली. आसगाव परिसरात बिगर गोमंतकियांकडून जमिनी घरे विकत घेण्याच्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांनी कायद्याचे पालन करुन व्यवस्थित रहावे असाही सल्ला दिला.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांवर झालेल्या अन्यायाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या घराचीही पाहणी केली. काही सामाजिक संघटनांनी आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. तसेच त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. यात प्रतिमा कुतिन्हो, तारा केरकर यांचा समावेश आहे.

दोघे अटकेत

या प्रकरणात हणजूण पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी जेसीबी चालक प्रदीप राणा याला अटक केली होती तर काल, मंगळवारी दोनापावला स्थित रिअल इस्टेट एजंट तसेच व्यावसायिक अर्शद ख्वाजा याला अटक करण्यात आली आहे. आणखीन काही व्यक्तींना अटक करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

२४ वर्षापासून वास्तव्य

२०१६ मध्ये क्रिस पिंटो यांनी घरपट्टी, नळ व पाणी जोडणी प्रदीप आगरवाडेकर यांच्या नावावर करण्यासाठी ना हरकत दाखलापंचायतला दिला होता. यास अनुसरून घरपट्टी नळ व पाणी जोडणी प्रदीप आगरवाडेकर यांच्या नावावर हस्तांतरित केली होती. हे कुटुंबिय २४ वर्षे या घरात राहत आहे, अशी माहिती सरपंच हनुमंत नाईक यांनी दिली.

असे झाले अपहरण!

झालेल्या प्रदीप आगरवाडेकर यांचा मुलगा प्रिन्स अगरवाडेकर यांनी अपहरण प्रकरणाची माहिती दिली. आई पोलीस स्थानकावर तक्रार देण्यासाठी गेली होती, तर मुलगा व वडील घरातच होते. काही वेळाने घर मोडण्यासाठी गाडीमधून बाऊन्सर आले. त्या बाउन्सरने घरात येऊन शिव्या दिल्या. त्याचवेळी तिघांनी जबरदस्तीने गाडीत बसवले व पेडणे तालुक्यात घेऊन गेले. त्याबाबत कोणालाही सांगू नये असा इशारा देऊन हणजूण येथे सोडण्यात आले. वडील प्रदीप अगरवाडेकर यांना या प्रकरणातून मानसिक धक्का बसला असून सदर कुटुंबीय भीतीच्या छायेखाली वावरत आहे.

सर्व संशयितांना अटक करा, निरीक्षकांना हटवा

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन सर्व संशयितांना अटक करावी. तसेच हनीफ, इम्रान या संशयितांसोबत पूजा शर्मालाही अटक व्हावी, या प्रकरणात चालढकल करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना बडतर्फ करावे. तसेच महासंचालकांची बदली करावी, अशी मागणी काल काँग्रेसने केली आहे. यावेळी या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या वतीने करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काल, मंगळवारी काँग्रेसकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप तसेच इतर नेते सहभागी झाले होते.

कोणत्याही गैरकृत्यांना राज्यात थारा दिला जाणार नाही. लवकरच तुम्हाला याचे परीणाम दिसून येतील. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत