शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावलेल्या बेवारस जमिनी सरकार ताब्यात घेणार: मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: January 10, 2024 13:54 IST

न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाने स्विकारला

किशोर कुबल, पणजी : जमीन बळकाव प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाने स्विकारला असून सर्व प्रकरणांमध्ये आरोपपत्रे सादर केली जातील तसेच बनावट कागदपत्रे तयार करुन ज्या बेवारस जमिनी बळकावल्या त्या सरकार ताब्यात घेईल. ज्यांनी कायदेशीर दावे केले आहेत त्यांच्या जमिनी सोपस्कार पूर्ण करुन त्यांना दिल्या जातील.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले कि,‘आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल. अनेक प्रकरणांमध्ये खोटे दस्तऐवज तयार करुन भलत्याच्याच जमिनी विकलेल्या आहेत, असे आयोगाला आढळून आलेले आहे. पुरातत्त्व विभागातील जमिनींचे दस्तऐवज ताब्यात घेऊन सरकारने ते स्कॅन करावेत असे आयोगाने सुचवले आहे. या गोष्टी केल्या जातील.’

मुख्यमंत्री म्हणाले कि,‘जमीन बळकाव प्रकरणात एसआयटीचा चौकशी अहवाल सरकारला अजून मिळायचा आहे. ९ जणांना अटक झाली. त्यातील दोघे तिघे सरकारी कर्मचारी होते. या सरकारी कर्मचाऱ्यांवरही आरोपपत्रे सादर केली जातील.

वाळू उपशासाठी महिनाभरात परवाने

वाळू उपशासाठी महिनाभरात परवाने देऊ, असे एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की,‘मांडवी, झुवारी, शापोरा नद्यांच्या बाबतीत अहवाल आलेले आहेत. शक्य तेवढ्या लवकर जागा वगैरे निश्चित करुन वाळू उपसा परवाने दिले जातील. पारंपरिक पध्दतीनेच वाळू उपशास परवानगी असेल. यंत्रसामुग्री वापरता येणार नाही. तूर्त शेजारी राज्यांमधून वाळू आणण्याची व्यवस्था केलेली आहे. परप्रांतीय ट्रकांना ५०० रुपये शुल्क लागू केले आहे. कोणीही हे ट्रक अडवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत