शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

राज्यपाल वांच्छूंवरही राजीनाम्यासाठी दबाव

By admin | Updated: June 18, 2014 07:25 IST

पणजी : उत्तर प्रदेश, कर्नाटकमधील राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांच्यावरही राजीनामा देण्यासाठी दबाव येऊ लागला

पणजी : उत्तर प्रदेश, कर्नाटकमधील राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांच्यावरही राजीनामा देण्यासाठी दबाव येऊ लागला असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळाली. केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर असताना ज्या राज्यपालांची नियुक्ती झाली होती, त्या सर्वांना आता राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा देशात सुरू असतानाच उत्तर प्रदेश व कर्नाटकमधील राज्यपालांनी मंगळवारी आपल्या पदांचे राजीनामे दिले. राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा, केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित, गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल व गोव्याचे राज्यपाल वांच्छू यांनाही पद सोडावे लागेल, अशा प्रकारची चर्चा आहे. अल्वा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे गेल्या शनिवारी गोवा भेटीवर आले असता, गोव्याचे राज्यपाल वांच्छू यांच्याशी त्यांची भेट झाली आहे. दुपारच्या वेळी पंतप्रधान काबो राजभवनावर होते. वांच्छू हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत दाबोळी विमानतळावर गेले होते. दरम्यान, यूपीएने नेमलेले राज्यपाल आता राजीनामे देऊ लागल्याने गोव्याचे राज्यपालही दबावाखाली येऊन राजीनामा देतील, असे मानले जात आहे. राज्यपाल वांच्छू यांचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चांगले संबंध आहेत. अनेकदा शिष्टाचाराचा बाऊ न करता वांच्छू हे गोव्यात फिरताना आढळतात. त्यांनी पर्रीकर सरकारशी कधी संघर्ष केला नाही; पण त्यांची नियुक्ती यूपीए सरकारने केली होती व त्यामुळे त्यांना जावे लागेल, अशी भाजपच्या काही नेत्यांना अपेक्षा आहे. (खास प्रतिनिधी)