शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

सरकारचा मुड आॅफ!

By admin | Updated: August 20, 2015 02:14 IST

पणजी : नागपंचमीच्या सणानिमित्ताने राज्यात बुधवारी सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना सरकारसाठी मात्र हा दिवस वाईट गेला. एका बाजूने सत्ताधारी पक्षाचे

पणजी : नागपंचमीच्या सणानिमित्ताने राज्यात बुधवारी सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना सरकारसाठी मात्र हा दिवस वाईट गेला. एका बाजूने सत्ताधारी पक्षाचे मोठे राजकीय शत्रू दिगंबर कामत यांना विशेष न्यायालयाने लाचखोरी प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला, तर दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू असलेले आयडीसीचे अधिकारी घनश्याम ऊर्फ दिलीप मालवणकर हे लाच प्रकरणीच ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले. या दुहेरी धक्क्याने हादरलेल्या सरकारचा सणासुदीच्या दिवशी मुड आॅफ झाला. या दोन्ही घटनांमुळे सरकार काहीसे सुन्न झाल्याचा अनुभव आला. नेमकी कोणती प्रतिक्रिया द्यावी हे बराच वेळ सत्ताधाऱ्यांमधील अनेकांना समजत नव्हते. कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर होणार नाही व त्यामुळे त्यांना अटक करावीच लागेल, असे सरकारला वाटले होते. सरकारने पोलिसांमार्फत अटकेची सर्व तयारी केली होती. मात्र, कामत यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याचे बुधवारी सकाळीच निष्पन्न झाले आणि सत्ताधारी गटात नाराजी पसरली. कामत यांना अटकपूर्व जामीन कसा काय मिळाला, असा प्रश्न सरकारमधील अनेकांना पडला. सायंकाळी औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी मालवणकर यांना एक लाख रुपयांच्या लाचप्रकरणी पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने पकडले. योगायोगाने मालवणकर हे मुख्यमंत्री पार्सेकर यांचे साडू निघाले आणि सरकारमध्ये प्रचंड खळबळ उडाली. सोशल साईट्सवरून लगेच मालवणकर यांच्या छायाचित्रासह हे वृत्त फिरू लागले. पार्सेकर यांचे ते साडू असल्याची वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. मालवणकर यांच्या पालये गावात तसेच त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या कोलवाळमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या मांद्रे मतदारसंघातही हीच चर्चा प्रत्येकाच्या ओठी दिसून आली. (खास प्रतिनिधी)