शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी आधार स्कॅनरखाली

By admin | Updated: March 5, 2017 02:23 IST

पणजी : वर्षाला तीनशे कोटी रुपये खर्च होणाऱ्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांची झडाझडती सरकार घेणार आहे. लोककल्याणासाठी

पणजी : वर्षाला तीनशे कोटी रुपये खर्च होणाऱ्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांची झडाझडती सरकार घेणार आहे. लोककल्याणासाठी थेट दिली जाणारी ही रक्कम किती सत्कारणी लागते ते पाहण्याचे सरकारच्या नियोजन व सांख्यिकी खात्याने ठरवले आहे. त्यासाठीची पाहणी (सर्व्हेक्षण) केली जाणार आहे.गृहआधार योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा प्रत्येकी दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य सरकार देत आहे. महागाईवर उतारा म्हणून पाच वर्षांपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली होती. पाच वर्षांच्या कालावधीत महागाई कमी झाली नाही, उलट ती वाढल्यामुळेच सरकारने अर्थसाह्य दीड हजार रुपये केले. या दोन्ही योजनांचे मूल्यांकन पाच वर्षांत झालेले नाही. सरकारने मूल्यांकन करून घेण्यासाठी अगोदर पाहणी करावी, असे ठरविले. नियोजन व सांख्यिकी खात्याने त्यासाठी अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. तो सरकारने मान्य केला आहे. यापूर्वी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची ेपाहणी केल्यानंतर काही बोगस लाभार्थी आढळले. शिवाय योजनेतील काही गैरप्रकारही उघड झाले. लाभार्थीचा मृत्यू झाल्यानंतरही बँकेत या योजनेखाली पैसे जमा होण्याचा प्रकारही उघड झाला होता. जे लोक निराधार नाहीत, त्यांनी देखील राजकीय वरदहस्ताने सरकारचा पैसा खाल्ल्याचे समोर आले होते. अशा हजारो लाभार्थींना नंतर सरकारच्या समाज कल्याण खात्याने नोटीस पाठवून काही कोटी रुपयांची वसुली केली होती. याच धर्तीवर गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांच्या लाभार्थींची आता पाहणी होणार आहे. त्यासाठी महिला व बाल कल्याण खात्याचे कर्मचारी (फिल्ड वर्कर्स) गावांसह शहरांत जाऊन लाभार्थींशी संपर्क साधणार आहेत.