शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बार वाचविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा

By admin | Updated: April 2, 2017 02:26 IST

पणजी : राज्यातील महामार्गांच्या बाजूचे सगळे बार तसेच दारुविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र

पणजी : राज्यातील महामार्गांच्या बाजूचे सगळे बार तसेच दारुविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका सादर करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे मंत्री विजय सरदेसाई व जयेश साळगावकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. या वेळी गोवा फॉरवर्डचे खजिनदार सूरज लोटलीकरही उपस्थित होते. तावेर्न वगैरे गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे. ती आमची वारसास्थळे आहेत, असे नमूद करून सरदेसाई म्हणाले, की यापूर्वीच्या सरकारने न्यायालयात फेरविचार याचिका सादर करायला हवी होती. सिक्कीम व मेघालयाला न्याय मिळाला. आता तरी गोवा सरकारने न्यायालयात स्वतंत्र याचिका सादर करून गोव्याचे वेगळेपण न्यायालयासमोर मांडावे. बार बंद झाले तर गोव्याचा पर्यटन उद्योगही अडचणीत येईल.सरदेसाई म्हणाले, की गोमंतकीय दारू प्याले तरी ते जबाबदारीने वागतात. त्यामुळेच गोव्यातील महामार्गांवर दारू पिऊन अपघातात मृत्यू पावल्याचे वार्षिक प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर ही गोष्ट मांडणे गरजेचे आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष हा ठामपणे दारू व्यावसायिकांसोबत आहे. येत्या सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेईन आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडेन. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आम्हाला मान्य नाही, तो एकतर्फी आहे.सरदेसाई म्हणाले, की दारू पिऊन वाहन चालविण्यास गोव्यात बंदीच आहे. जर कोणी मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्यास त्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी. त्यासाठी अल्कोमीटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जावा. मुंबईत कोणीच दारू पिऊन गाडी चालवत नाही. पोलिसांकडून तिथे अडविले जाते. महामार्गांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. दारू दुकाने बंद करणे हा त्यावर उपाय नव्हे. दारूचा संबंध ‘गोंयकारपणा’शीही आहे व त्यामुळे आम्ही या विषयावर स्वस्थ बसणार नाही. ज्या महिलांकडून बारबंदीचे स्वागत केले जाते, त्यांनीही थोडा विचार करावा.(खास प्रतिनिधी)