पणजी : महिलांच्या लैंगिक छळाबाबत येणाऱ्या तक्रारी गंभीरपणे घेणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. कायदा हा सगळ््यांना समान असल्याचेही ते म्हणाले. गुरुवारी पणजी महिला पोलीस ठाण्यात राष्ट्रीय वृत्तसंस्थेचा गोव्यातील पत्रकार रूपेश सामंत याच्या विरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार महिला पत्रकारांनी नोंद केलेली आहे. यासंबंधात शुक्रवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. कुणालाच मोकळे सोडले जाणार नाही. तसेच अनावश्यक शिक्षा दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी स्पष्ट केले. महिला व मुलांच्या बाबतीत येणाऱ्या तक्रारी सरकार गंभीरपणे घेत आहे. तक्रारीचा शेवटपर्यंत तपास करत आहे. कायदा मजबूत असल्यामुळे कायद्याप्रमाणे सगळे उघड होईल, असे पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर यांनी या वेळी पत्रकारांना सांगितले. तेजपालप्रमाणेच सामंत संदर्भातील तक्रार गंभीरपणे घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
तक्रारींविषयी सरकार गंभीर : मुख्यमंत्री
By admin | Updated: September 26, 2015 03:25 IST