शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ निवडणुकीत सरकारचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 02:11 IST

पणजी : गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या कार्र्यकारी समितीसाठी शुक्रवारी (दि. २६) निवडणुका होत आहेत. तथापि, या निवडणुका

पणजी : गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या कार्र्यकारी समितीसाठी शुक्रवारी (दि. २६) निवडणुका होत आहेत. तथापि, या निवडणुका भाजयुमो गटास जिंकता याव्यात म्हणून सरकार निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे व विद्यापीठावरही दबाव आणत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी येथे केला. विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे आणि एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष टेराज मुल्ला यांच्या उपस्थितीत फालेरो यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. आम्ही विद्यापीठात कधी हस्तक्षेप करत नाही. विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. विद्यापीठ व शिक्षण क्षेत्र राजकारणापासून दूर ठेवायला हवे. तथापि, सरकारने सध्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे काही चालवले आहे ते अत्यंत आक्षेपार्ह व अन्यायकारक आहे, असे फालेरो म्हणाले. एनएसयूआयची प्रतिनिधी प्रचीती गुरव हिने सादर केलेला उमेदवारी अर्ज ऐनवेळी योग्य कारण न देता फेटाळण्यात आला आहे. वास्तविक उमेदवारी अर्जासोबत तिने सगळी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याची पावती अगोदर तिला देण्यात आली होती. हा अन्याय विद्यापीठाने दूर केला नाही तर निवडणूक प्रक्रियेशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी आम्ही करू, असे फालेरो यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी कुलपती या नात्याने राज्यपालांनी हस्तक्षेप करून नि:पक्षपाती चौकशी करून घ्यावी, अशीही मागणी फालेरो यांनी केली. गोवा विद्यापीठात लोकशाहीचा खून सुरू आहे. दिल्लीतील नेहरू विद्यापीठातही भाजप सरकारने हेच काम केले होते, असे फालेरो म्हणाले. राणे यांनीही या वेळी विद्यापीठाच्या निवडणुका या चांगल्या वातावरणात व्हायला हव्यात, असे मत मांडले. अशा प्रकारे कुणावर अन्याय होऊ नये याची काळजी नवे कुलगुरू साहनी यांनी घ्यावी, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)