शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात किना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:50 IST

गोव्यातील सागरकिना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मोठी व्यापक उपाययोजना केली जात आहे. एक महिन्याने नवा पर्यटन मोसम सुरू होत असून अनुचित घटनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होऊ नये म्हणून सरकार कृती आराखडा तयार करत आहे.

सद्गुरू पाटील पणजी : गोव्यातील सागरकिना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मोठी व्यापक उपाययोजना केली जात आहे. एक महिन्याने नवा पर्यटन मोसम सुरू होत असून अनुचित घटनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होऊ नये म्हणून सरकार कृती आराखडा तयार करत आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोवा पोलीस, शॅक व्यावसायिक, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स संघटनांचे पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक, जीवरक्षक संस्था व पर्यटन खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेतली. कायदा सचिवांची एक समितीही स्थापन केली आहे. समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू रोखण्याचे रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.महिन्याभरात एक कोटीपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ पकडून पंधरापेक्षा जास्त व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे अलीकडेच दोन पर्यटकांचा हणजूण येथे मृत्यू झाला. अमली पदार्थांच्या व्यापारास आळा घालण्याचेही प्रयत्न आहेत.गोव्यात वाहन अपघातांमध्येही पर्यटकांचे बळी जातात. मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांनी किनारपट्टीत सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४०० जीवरक्षक गोव्याच्या १०५ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीत असतात. ही संख्या वाढविली जाणार आहे.>आम्ही पर्यटकांच्या सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही. गोव्याचे पर्यटन अधिक सुरक्षित बनविण्यासाठी कृती योजना तयार केली जात आहे. बुडून मृत्यू पावणाºयांचे प्रमाण रोखण्यासाठी एक शासकीय समितीही नेमली गेली आहे. - बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री