शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीय साहित्यिक गुरुनाथ नाईक यांना महाराष्ट्र शासनातर्फे मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 16:26 IST

सध्या आजारी असलेले ज्येष्ठ साहित्यिक, रहस्यकादंबरीकार गुरुनाथ नाईक यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ७५ हजार रुपयांचा धनादेश रविवारी नाईक यांना प्रदान करण्यात आला.

पणजी : सध्या आजारी असलेले ज्येष्ठ साहित्यिक, रहस्यकादंबरीकार गुरुनाथ नाईक यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ७५ हजार रुपयांचा धनादेश रविवारी नाईक यांना प्रदान करण्यात आला. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण विश्वस्त निधीतून ही मदत देण्यात आली असून, राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूरचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी हा धनादेश नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.रहस्यकथांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले नाईक यांनी दीर्घकाळ पत्रकारिताही केली आहे. गेली काही वर्षे ते गोव्यात स्थायिक झाले आहेत. अलिकडे वयोमानानुसार त्यांची प्रकृती बिघडली असून, सद्या ते पणजी येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्याबद्दल माहिती मिळाल्यावर माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी त्याची दखल घेऊन नाईक यांच्या औषधोपचारासाठी पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधून मदत देण्याचे आदेश दिले. माहिती संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, माहिती संचालक (वृत्त-जनसंपर्क) शिवाजी मानकर यांनी याबाबतची कार्यवाही तातडीने करून पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधून मदत देण्याची कार्यवाही केली.आज लळीत यांनी पणजी येथील इस्पितळात नाईक यांची भेट घेतली व त्यांना धनादेश सुपुर्द केला. नाईक यांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होऊन त्यांनी पूर्ववत साहित्यसेवा सुरू करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.