शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉत महिला डॉक्टरची सतावणूक

By admin | Updated: July 29, 2016 02:11 IST

पणजी : गोवा वैद्यकीय माहाविद्यालयात आणखी एका सतावणूक प्रकरणी तक्रार नोंद झाली आहे. शरीरशास्त्राच्या विभाग

पणजी : गोवा वैद्यकीय माहाविद्यालयात आणखी एका सतावणूक प्रकरणी तक्रार नोंद झाली आहे. शरीरशास्त्राच्या विभाग प्रमुखाविरुद्ध गोमेकॉतील एका महिला डॉक्टरने ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकशीचा अहवाल आरोग्य सचिवांना सादर करण्यात आला आहे. हा डॉक्टर महिलांना सन्मानजनक वागणूक देत नसल्याच्या तक्रारी होत्या. महिलेने केलेल्या नवीन तक्रारीत या डॉक्टरने आपला छळ केल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही गोमेकॉत छळवणुकीची प्रकरणे घडली होती. तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि चौकशीही झाली होती. महत्त्वाचे म्हणजे ज्या डॉक्टरच्या विरोधात ही नवीन तक्रार करण्यात आली आहे, त्याच्या विरुद्धच अशाच प्रकारची तक्रार यापूर्वीही नोंदविण्यात आली होती. आपल्याच विभागातील एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा त्याच्यावर ठपका होता. सलग दुसऱ्या प्रकरणामुळे हा डॉक्टर अडचणीत आला आहे. पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणात गोमेकॉ प्रशासनाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर या प्रकरणात चौकशीही करण्यात आली. चौकशीचा अहवाल गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी आरोग्य खात्याचे अतिरिक्त सचिव आणि गोमेकॉचे प्रशासक सचिन शिंदे यांना सादर केला आहे. गुरुवारी दुपारी आपल्याला हा अहवाल मिळाल्याची माहिती शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभाग प्रमुख म्हणून काम करताना ते आपल्या सहकर्मचाऱ्यांच्या सेवेविषयीच्या गोपनीय अहवालात नकारात्मक गोष्टी लिहितात. अनेक डॉक्टरांच्या तशा तक्रारी आहेत. ते करण्यापूर्वी तसे करीन म्हणून धमकीही देतात. त्यामुळे कर्मचारी त्यांना घाबरतात. महिला कर्मचाऱ्यांची तर गोचीच होते. गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी सचिवालयात सादर केलेल्या अहवालात या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)