शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर १८ लाख रुपयांचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 19:55 IST

दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर इंडिया’ विमानाच्या (एआय ९९४) प्रवाशांची येथे तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिका-यांना एका प्रवाशावर संशय आला.

वास्को: दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांना आढळून येताच त्याची येथे झडती घेतली असता त्यांने आपल्या ‘जींन्स पेंन्ट’ ला कमरेला बांधून आणलेले ५९० ग्राम तस्करीचे सोने आढळले. हे सोने त्या प्रवाशाने ‘पेस्ट’ पद्धतीने लपवून आणल्याचे तपासणीच्या वेळी उघड झाले असून याबाबत कारवाई करून कस्टम अधिकाऱ्यांनी सदर सोने जप्त केले.

दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार सदर कारवाई आज (दि.६) करण्यात आली. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर इंडिया’ विमानाच्या (एआय ९९४) प्रवाशांची येथे तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिका-यांना एका प्रवाशावर संशय आला. यावेळी त्याला बाजूत घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांने आपल्या ‘जींन्स पेंन्ट’ वर कमरेच्या भागात पाकीटात काहीतरी चिकटवून आणल्याचे अधिका-यांच्या उघडकीस आले. अधिका-यांनी त्वरित हे पाकीट उघडले असता यात ‘पेस्ट’ पद्धतीने तस्करीचे सोने लपवून आणल्याचे स्पष्ट होताच हे सोने कस्टम कायद्याखाली जप्त केले.

जप्त करण्यात आलेले सदर सोने ५९० ग्राम वजनाचे असल्याची माहिती कस्टम अधिका-यांनी देऊन भारतीय बाजारात याची रक्कम १८ लाख ९ हजार ६८४ रुपये असल्याची माहीती त्यांनी दिली. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे कमिश्नर आर मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमिश्नर एन.जी पटेल, दिपक गवाय व इतर कस्टम अधिका-यांनी सदर कारवाई केली. हे तस्करीचे सोने कुठे नेण्यासाठी आणले होते व कुठून आणले होते याबाबत अधिक तपास चालू आहे.ह्या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावर अजून पर्यंत २ कोटी ५४ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त१ एप्रलि २०१८ ते अजून पर्यंत विविध तस्करीच्या प्रकरणात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी एकूण २ कोटी ५४ लाख ५० हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहीती कस्टम अधिकाºयांनी दिली. याबरोबरच दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी चालू आर्थिक वर्षात विविध प्रकरणात कारवाई करून बेकायदेशीर रित्या नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असलेली ७५ लाख १४ हजार रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केली आहे.

टॅग्स :goaगोवा