शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात 6700 कोटींचा बेहिशेबी टॅक्सी व्यवसाय, जीएसटीचा पत्ता नाही, गोवा माईल्सचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 11:49 IST

गोव्यात एकूण 32 हजार टॅक्सी असून त्यांच्याकडून वार्षिक 6 हजार 700 कोटी रुपयांचा व्यवसाय केला जातो.

पणजी : गोव्यात एकूण 32 हजार टॅक्सी असून त्यांच्याकडून वार्षिक 6 हजार 700 कोटी रुपयांचा व्यवसाय केला जातो. मात्र गोवा सरकारला जीएसटी भरला जात नाही. कारण त्यांचा सगळाच व्यवहार रोखीने असतो व त्या व्यवहाराची नोंदही कुठेच राहत नाही, असा दावा गोवा माईल्स टॅक्सी ऍप सेवेचे चालक व अन्य लाभार्थीनी मिळून शुक्रवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.गोवा माईल्सकडे फक्त दीड हजार टॅक्सी व दीड हजार चालक आहेत. या टॅक्सी गोमंतकीयांच्या आहेत आणि हे चालकही गोमंतकीय आहेत, असे गोवा माईल्सचे प्रवक्ते जस्टन नुनीस तसेच हेमंत प्रभू चोडणेकर व अन्य व्यावसायिक म्हणाले. गोवा माईल्सच्या टॅक्सी वगळता राज्यात एकूण 32 हजार नोंदणीकृत टॅक्सी आहेत. रोज प्रत्येक टॅक्सीकडून सरासरी 70 रुपये प्राप्त केले जातात. हा सगळा व्यवहार रोखीने चालतो. यावर हे टॅक्सी व्यवसायिक पाच टक्के जीएसटी सरकारला जमा करत नाहीत. गोवा माईल्सच्या टॅक्सींकडून मात्र पाच टक्के जीएसटी शासकीय तिजोरीत जातो. जर 32 हजार टॅक्सींकडून जीएसटी आला असता तर वार्षिक तीनशे कोटींचा महसुल सरकारी तिजोरीत जमा झाला असता, असा दावा गोवा माईल्सच्या चालकांनी केला.गेल्या वर्षी सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने गोवा माईल्सची सेवा सुरू केली. या सेवेला ज्या टॅक्सी संघटना विरोध करतात, त्यांच्याकडून गोवा माईल्सविषयी अत्यंत चुकीचे चित्र उभे केले जात आहे. आम्ही परप्रांतांमधील आहोत असे दाखविले जात आहे. आम्ही गोमंतकीयच आहोत. गोव्याच्या सर्वच भागांतील टॅक्सींना गोवा माईल्स अॅपच्या सेवेखाली आणण्याचा प्रयत्न आहे. सरकारचा आम्हाला पाठींबा आहे. गोवा माईल्सच्या चालकांवर हल्ले केले जातात, त्यांना धमक्या दिल्या जातात. आम्ही विविध पोलीस स्थानकांमध्ये 16  एफआयआर आणि 8 अदखलपात्र गुन्हे नोंद केले आहेत, असे माईल्सच्या चालकांनी सांगितले.